कुडाळ /-


महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने कुठलीही नोटीस न देता अचानक पणे सरंबळ, सोनवडे.नेरुर देऊळवाडा, पिंगुळी, वालावल, चेंदवन,कवठी,मांडकुली या गावातील स्ट्रीट लाईट वीज कनेक्शन कट करण्यात आली. यासंदर्भात आज संध्याकाळी 8 वाजता शिवसेना सरपंच एकत्रित येत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीविरोधात आक्रमक पवित्रा घेतला अशातच या विभागाचे सोनवणे या अधिकाऱ्यांने उडवाउडवीची उत्तरे दिली त्यामुळे शिवसेना सरपंच अधिक आक्रमक बनले आणि शेवटी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे लोकरे साहेबांनी नमतेपणा घेत सर्व ग्रामपंचायतीच्या बंद केलेल्या स्ट्रीट लाईट चालू करण्याचा आदेश दिला. स्ट्रीट लाईट संदर्भात कुडाळ तालुका सरपंचाची एकत्रित बैठक जो पर्यंत घेत नाही व योग्य मार्गदर्शन होत नाही तोपर्यंत लाईट बिल भरली जाणार नाही.असा इशारा देण्यात आला.
यावेळी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश पावसकर, नेरुर सरपंच शेखर गावडे,पावशी सरपंच बाळा कोरगावकर,कुंदे सरपंच सचिन कदम, मांडकुली सरपंच तुषार सामंत, पिंगुळी सरपंच निर्मला पालकर, चेंदवण सरपंच उत्तरा धुरी,तसेच पिंगुळी, नेरूर,चेंदवन गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page