मसुरे /-

मध्य प्रदेश उज्जैन येथे या वर्षी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत श्री पार्लेश्वर व्यायामशाळेतील आठ जणांनी सहभाग घेऊन तब्बल पंधरा  पदके पटकावत  विजय मिळवला. श्री पार्लेश्वर व्यायाम शाळेचे प्रशिक्षक श्री गणेश  देवरुखकर  यांच्या परिश्रमाने तसेच खेळाडूंनी घेतलेल्या मेहनतीने आणि पालकांच्या मदतीने ही गोष्ट शक्य झाली आहे.
करोना नंतरच्या या पहिल्याच स्पर्धेत  राज्यस्तरीय स्पर्धेसाठी एकूण १३ खेळाडूंची निवड झाली. एकाच दिवशी चार वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत खेळाडूंनी कमी वेळेत आपले जास्तीत जास्त चांगले कौशल्य दाखवले. त्यातीलच आठ खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आणि ते आठवड्याभरातच राष्ट्रीय स्पर्धेसाठी उज्जैनला रवाना झाले. या आठ खेळाडूंनी वैयक्तिक सात पदके आणि सांघिक आठ पदके अशी एकूण १५ पदकांची लयलूट केली आणि श्री पार्लेश्वर व्यायाम शाळेचे आणि गणेश सरांचे नाव लौकिक केले.
तनश्री जाधव हिने १४ वर्षाखालील मुलींच्या गटात पुरलेल्या मल्लखांबात सुवर्णपदक, दोरी मल्लखांबात रौप्यपदक  आणि वैयक्तिक विजेतेपदा मध्ये देखील रौप्यपदक पटकावले तसेच सांघिक सुवर्णपदक असे एकूण चार पदके पटकावली.
रिषभ घुबडे याने १८ वर्षाखालील गटात पुरलेल्या मल्लखांबात कास्यपदक तसेच दोरी मल्लखांबात कांस्यपदक तर सांघिक रौप्यपदक अशी एकूण तीन पदके पटकावली.
सोहम शिवगण याने देखील १४ वर्षाखालील गटात वैयक्तिक विजेतेपदात कांस्यपदक तसेच सांघिक कांस्य पदक पटकावले आहे.
आदी वायंगणकर याने १४ वर्षाखालील गटात पुरलेल्या मल्लखांबात वैयक्तिक कास्यपदक आणि सांघिक विजेतेपदामध्ये देखील कास्य पदक पटकावले.
तसेच अक्षय तरळ याला देखील खुल्या गटात सांघिक सुवर्णपदक मिळाले आहे.
त्याचप्रमाणे १२ वर्षाखालील गटात सानवी देसाई आणि शिवांगी पै यांनी सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक  मिळविले.  पार्लेश्वर व्यायाम शाळेचे मार्गदर्शक श्री महेश अटाळे सर तसेच गणेश देवरुखकर इशा देवरुखकर आणि अविनाश मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page