वेंगुर्ला /-


आपल्या वैद्यकीय पेशातून सामाजिक भान जागृत ठेवत संवेदनशीलतेने सामान्य माणसाला आणि खासकरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना वेळोवेळी मदत करणारे, जिल्ह्यात आजवर डॉ. संजय ओक, डॉ. तात्याराव लहाने, सुविख्यात कॅन्सर पेशंट एड्स असोसिएशन यांची शिबिरे वेळोवेळी आयोजित करणारे तसेच गेल्या भाजपा सरकारच्या काळात मुख्यमंत्री सहाय्यता कक्षासोबत संलग्नित राहून अनेक रुग्णांना आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी माध्यम ठरलेले मूळ कुडाळ तालुक्यातील वालावल गावचे डॉ.अमेय देसाई यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने वैद्यकीय आघाडीच्या कोकण विभाग प्रभारी तथा महाराष्ट्र प्रदेश सह-संयोजक पदी त्यांची निवड केलेली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनल्याण समिती मुंबई महानगर, महाराष्ट्रात १८ वर्षांवरील अनाथांकरिता काम करणारे तर्पण फौंडेशन, कुडाळ येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्था, कासार्डे येथील सिंधुभूमि रुग्णसेवा समिती, गिरगाव (मुंबई) येथील कुडाळदेशकर निवास सार्वजनिक गणेशोत्सव, महालक्ष्मी (मुंबई) येथील कॅन्सर पेशंट एड्स असोसिएशन अशा अनेक संस्थांवर गेल्या दशकभरात आपल्या कामाचा ठसा उमटवणारे डॉ. देसाई आता भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कोकणात आणि पर्यायाने महाराष्ट्रात पक्षाचे काम तळागाळातील, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करणार आहेत. ऑक्टोबर अखेरीस सिंधुदुर्ग , नोव्हेंबर मध्यात रत्नागिरी तसेच डिसेंबर मध्यात रायगड मधील सर्वच विधानसभाक्षेत्रांच्या दौऱ्यावर ते असणार आहेत.आजवरचा सामाजिक क्षेत्रातील अनुभव, पक्ष नेतृत्वासोबत असलेला संपर्क आणि कोकणच्या मातीशी जुळलेली नाळ हे समीकरण येणाऱ्या काळात काय परिणाम करते हे पहाणे औत्सुक्याचे राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page