कुडाळा /-

कुडाळ तालुक्यातील हुमरमळा गावातील शिवसेनेच्या असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेशजी राणे साहेब यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. हल्लीच कुडाळ पंचायत समितीच्या सदस्यांचा भाजप मध्ये प्रवेश करून निलेश राणेंनी सेनेला धक्का दिला होता.

विशेष म्हणजे आज निलेशजी राणे साहेब यांना कुडाळला येत असताना काही कारणामुळे विलंब झाला.प्रवेशाचा वेळ संध्याकाळी 7 चा होता तरी रात्री 11 वाजता असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती पहायला मिळाली.

आज हुमरमळा गावातील युवा सेनेचे शाखा प्रमुख विरेंद्र सावंत, हर्षद जळवी, अजित परब, योगेश परब, आदेश तावडे, अनिकेत तावडे, आशिष परब, विकास तावडे, सुशांत सावंत, दशरथ सामंत, अनंत तावडे,मनिष मार्गी,महेश कानडे,सुरेश सावंत,विठ्ठल कानडे,अजिंक्य तावडे,गजा तावडे,सुशिल तावडे,प्रकाश परब,अमित खोबरेकर, सुबोध सावंत,सुमित परब,शुभम परब सह हुमरमळा गावातील असंख्य कार्यकर्त्यांनी माजी खासदार निलेशजी राणे साहेब यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला.

निलेश राणे आपल्या भाषणात म्हणाले की आज प्रवेशाचा जो कार्यक्रम कुडाळ तालुक्यातील हुमरमळा या ठिकाणी झाला, आपण ज्या विश्वासाने भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला, त्या विश्वासाला आम्ही सार्थ ठरु. मी या व्यासपीठावरून तुम्हाला शब्द देतो तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही निलेश राणे यांनी दिली.

स्थानिक आमदार गेल्या सात वर्षात स्वतः ठेकेदार झाला. आजची सामान्य शिवसैनिकांची खदखद ही आहे की, सत्तेतील आमदार असताना या मतदारसंघात कामे होत नाहीत, असे ते म्हणाले.

राणे साहेब सहा वेळा आमदार झाले, पण कधी ठेकेदार झाले नाहीत. मी लहानाचा मोठा कणकवली मालवण मतदार संघात झालो. नंतर आत्ताचा कुडाळ मालवण हा मतदारसंघ हा मतदारसंघ भकास करण्यासाठी स्थानिक आमदाराला फक्त 7 वर्षे लागली. कोणाच्या काळात या मतदारसंघात भयावह परिस्थिती निर्माण झाली ? असा सवाल त्यांनी केला. राणे साहेबांनी लाईफ टाईम हॉस्पिटल या ठिकाणी रुग्णांसाठी निर्माण करून दिलं. स्थानिक आमदाराने स्वतः च्या माध्यमातून एकही प्रकल्प गेल्या सात वर्षात आणला नाही. पण राणीसाहेबांनी विमानतळ आणला. त्याचं श्रेय घेण्यासाठी हे शिवसेनेचे लोकप्रतिनिधी राणे साहेबांवर आज टीका करतात. बाजूच्या रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचे पाच आमदार असतानाही संपूर्ण रत्नागिरी जिल्हा ओसाड पडलेला आहे, अशी टीका निलेश राणे यांनी केली.

ठाकरे सरकार आल्यापासून असा एक शेतकरी किंवा महिला समाधानी आहे ते दाखवा, असे आव्हानच त्यांनी दिले.हे राज्य ह्या सरकारच्या हातात सुरक्षित नाही शिवसेनेच्याआमदारची ओळख फक्त “जिल्हाप्रमुख” म्हणून गेल्या सात वर्षात स्थानिक आमदार स्वतःची ओळख निर्माण करू शकले नाही. महाराष्ट्राच्या सभाग्रहात एक भाषण दाखवा की कुडाळ मालवण मतदारसंघासाठी रस्त्यांसाठी निधी मिळाला पाहिजे किंवा तोक्ते वादळातील अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरपाई मिळाली पाहिजे.असे एक भाषण आमदार वैभव नाईक यांचे दाखवा. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर उभा राहून मतदार संघामध्ये निधी मागायची हिम्मत स्थानिक आमदार नाईक यांच्यात नाही त्यांनी फक्त गप्प आणि गप्प बसायच. पुढे राणे म्हणाले मागच्या पक्षप्रवेश झाला मी सांगितले होते की ही फक्त सुरुवात आहे असे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आहेत आज त्यांना शिवसेनेत रहायची इच्छा नाही.

आमदार जेवढे खातो तेवढं लोकांना तरी द्यावा हा कुठेपण गेला तरी खिशातून कधी काही निघणार नाही. एकेकाळी कुडाळ मालवणच्या आमदाराचा राज्यात रुबाब असायचा अधिकाऱ्यांवर वचक असायचा कलेक्टर आज आमदार अपॉइंटमेंट देत नाही.आपल्या राणे साहेबांनी आणलेला सी-वर्ल्ड प्रकल्प अजून तसाच आहे.

भारतीय जनता पार्टी परिवारात आपले मनापासून स्वागत करतो आज राज्यात सत्ता कोणाची आहे आपण सर्व भाजप मध्ये प्रवेश करत आहात केवढा मोठे पणा आहे. आज राणे साहेब केंद्रात केंद्रीय मंत्री आहेत त्याच्या माध्यमातून जेवढ्या योजना तसेच विविध माध्यमातून हा कुडाळ मालवण मतदारसंघांमध्ये निधी आणणार या कुडाळ-मालवण मतदारसंघाला रुबाबात रहायची सवय आहे. हा रुबाब असाच राहिला पाहिजे भाजप नेते निलेश राणे म्हणाले.

यावेळी जिल्हा परिषदेचे गटनेते रणजीत देसाई,सभापती नुतन आईर,कुडाळ तालुका अध्यक्ष विनायक राणे,दादा साईल,जिल्हा कार्यकारणी सदस्य आनंद शिरवलकर,मालवण सभापती अजिंक्य पाताडे,युवा नेते विशाल परब,युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस बाबा परब,पंचायत समितीच्या सदस्या प्राजक्ता प्रभू,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रुपेश कानडे,पप्या तवटे,माजी माजी नगरसेविका सौ साक्षी सावंत,सभापती पंचायत समितीचे सदस्य राजन जाधव,नागेश आईर,देवन सामंत,जगदीश उगवेकर,चंद्रकांत वालावकर,शेखर राणे,शेखर परब,राजा प्रभू ,आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page