मालवण /-

पंचायत समितीच्या ‘पंचायत समिती आपल्या दारी’ या उपक्रमाचा शुभारंभ मंगळवारी नांदोस येथे करण्यात आला. नांदोस ग्रामपंचायत सभागृह येथे नांदोस, तिरवडे, सुकळवाड ग्रामपंचायत क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या विकास कामांचा आढावा घेण्यात आला. जात रखडलेली कामे, जनतेच्या समस्या जाणून घेताना तालुकास्तरीय अधिकारी वर्गाच्या उपस्थितीत प्रश्न, समस्या तात्काळ सोडवणे तसेच योग्य ती कार्यवाही करणेबाबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तर दुपारी हेदुळ, खोटले, वायंगवडे या गावात पंचायत समिती आपल्या दारी अभियान पोहचले. मालवण पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर यांच्या संकल्पनेतील या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन जिल्हापरिषद वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी जिप सदस्या माधुरी बांदेकर, पंचायत समिती सदस्या मनीषा वराडकर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, सरपंच, उपसरपंच, सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते. तालुकास्तरीय अधिकारी, सर्व खातेप्रमुख यावेळी उपस्थित होते. एकाच छताखाली अधिकारी वर्गाच्या उपस्थितीत विकास कामांचा आढावा घेत समस्या जाणून घेत तात्काळ सुटणाऱ्या समस्या संबंधित अधिकारी वर्गाच्या माध्यमातून सोडवण्यात आल्या. ज्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेतला त्याला शुभारंभाला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादाबाबत सभापती पाताडे, उपसभापती परुळेकर यांनी समाधान व्यक्त केले. तालुक्यातील सर्व गावात हा उपक्रम राबवला जाणार असल्याचे सभापती अजिंक्य पाताडे यांनी माहिती देताना सांगितले. यावेळी जि प वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांनी मालवण पंचायत समिती मेहमीच अभिनव उपक्रम राबवण्यासाठी व ते यशस्वी करण्यात अग्रेसर आहे. त्याच धर्तीवर ग्राम विकासाच्या व जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी राबवण्यात येणारा पंचायत समिती आपल्या दारी हा उपक्रमही यशस्वी ठरेल. असा विश्वास व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page