वैभववाडी /-

“इंडियन टॅलेंट सर्च परीक्षा 2020-21 मध्ये वैभववाडी तालुक्यातील श्री महालक्ष्मी विद्यामंदिर कोकिसरे शाळेचा विद्यार्थी कु. आयुष प्रदीप नाळे याने राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. आयुषला पालक मेघा नाळे, मुख्याध्यापिका सुप्रिया शेटये, प्रफुल्ल जाधव, अमोल येणगे, प्रदीप नाळे यांचे मार्गदर्शन लाभले. आयुषच्या यशाबद्दल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, विस्तार अधिकारी अशोक वडर, केंद्रप्रमुख शिवाजी पवार, शाळा व्यवस्थापन समिती यांनी अभिनंदन केले. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून आयुषचे कौतुक होत आहे.

यापूर्वी आयुषने ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत सलग दोन वर्षे गोल्ड मेडल मिळवले आहे. डी. सी. ए. परीक्षेत तो राज्यात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. तसेच गुरुकुल परीक्षेत तो जिल्ह्यात पहिला आला असून मंथन परीक्षेत राज्यात सातवा क्रमांक त्याने पटकावला आहे. ‘मी होणार ऑफिसर’ या सामान्य ज्ञान परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक तर जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत त्याने दुसरा क्रमांक पटकावला आहे. अशा प्रकारे जिल्हा व राज्य पातळीवर त्याने आपल्या यशाचा बोलबाला कायम ठेवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page