कुडाळ /-

मुंबई कडुन गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासी लक्झरी बस झाराप तिठ्यावरून वळवून पुन्हा परत तेर्सेबांबर्डे येथील साईप्रसाद हाॅटेल कडे चहा पाण्यासाठी येतात.तिथे येण्याला आमचा विरोध नाही.पण चहा पाण्याचा कार्यक्रम झाल्यावर परत गोव्याच्या दिशेने जाताना तेर्सेबांबर्डे ते झाराप या सुमारे एक किलोमीटरच्या अंतरात विरूद्ध दिशेने बसेस नेतात.त्यामुळे नेहमी सकाळी सावंतवाडी.माणगांव खोरे. साळगांव.तेर्सेबांबर्डे.झाराप भागातील प्रवाशांना प्रवास करताना अक्षरश: जीव मुठीत घेऊन वाहनाने प्रवास करावा लागत आहे.तसेच यामुळे भविष्यात एखादी अघटित घटना घडल्यास जबाबदार कोण ? त्यापेक्षा त्वरित यावर निर्णय घेतल्यास अनेक समस्या दूर होतील.

यापूर्वी साळगांव माऊली मंदिर स्टाॅप नजीकच्या मिडलकट वरून या लक्झरी बसेस या तेर्सेबांबर्डे साईप्रसाद हाॅटेल कडे जात होत्या.मध्यंतरी या मिडलकटवर अपघात होऊन एक मृत्यू झालेला होता.त्यामुळे आम्ही सदरचे मिडलकट बंद करण्याची मागणी केली असता नॅशनल हायवे अॅथाॅरीटीने ते मिडलकट बंद केले.त्यामुळे हे मार्ग बंद झाल्याने या बसेस झाराप तिठ्यावरून वळवून पुन्हा परत साईप्रसाद हाॅटेल कडे येतात.व परत चुकीच्या दिशेने गोव्याच्या दिशेने जातात.त्या बसेस सरळ बिबवणे येथील पुलाखालून नेण्यात याव्यात,तशा सुचना लक्झरी मालक व चालक यांना देण्यात याव्यात,आणि याची अंमलबजावणी तातडीने होणे आवश्यक आहे.नपेक्षा साळगांव जांभरमळा नॅशनल हायवे स्टाॅपवर कोणतीही पूर्व कल्पना न देता लक्झरी बसेस रोखण्यात येतील.असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस भास्कर परब यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page