वेंगुर्ला /-


आडेली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आज मंगळवारी झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या प्राजक्ता प्रशांत मुंडये यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
वेंगुर्ले तालुक्यातील
आडेली ग्रामपंचायतीच्या सरपंच समिधा कुडाळकर यांच्या विरुध्द विशेष सभेत अविश्वास ठराव मंजूर झालेला होता.त्यामुळे गेली एक वर्ष सरपंच पद रिक्त होते.या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच अविश्वास ठरावामुळे पद रिक्त झाल्याने त्यासाठी निवडून आलेल्या सदस्यांमधून आज १२ ऑक्टोबर रोजी सरपंच पदासाठी पोटनिवडणूक घेण्यात आली.
अकरा सदस्य मधील सरपंच पदाच्या आरक्षणानुसार ही निवडणूक झाली.यावेळी प्राजक्ता प्रशांत मुंडये यांची बिनविरोध निवड झाली.यावेळी संतोष कासले,ज्ञानेश्वरी डिचोलकर,पल्लवी धुरी,घन:श्याम नाईक,रामचंद्र आडेलकर,प्राजक्ता मुंडये, छाया गावडे, लीलाधर मांजरेकर, सुप्रिया होडावडेकर आदी ९ सदस्य उपस्थित होते.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पं. स.विस्तार अधिकारी संदेश परब यांनी काम पाहिले.यावेळी निवड जाहीर होताच शिवसेना कार्यकर्त्यांनी घोषणा देत जल्लोष केला.तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब,उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे,बाळा दळवी,माजी सरपंच प्रकाश गडेकर यांनी नूतन सरपंच यांचे अभिनंदन केले.यावेळी सचिन गडेकर,माजी सरपंच भारत धरणे,सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत गडेकर,माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष नितीन मांजरेकर,शिवसेना उपतालुकाप्रमुख उमेश नाईक,तुषार कांबळी,प्रविण गडेकर,प्रशांत मुंडये,अण्णा वजराटकर,अरविंद बागायतकर,बाबा घोंगे,अशोक गावडे, संदिप कांबळी,मितेश परब,नेहा गडेकर,स्वप्निल गडेकर, सागर गडेकर आदींसह शिवसेना पदाधिकारी- कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.यावेळी प्रभारी सरपंच म्हणून यशस्वी काम केलेल्या उपसरपंच संतोष कासले यांचा संजय पडते यांच्या हस्ते शाल ,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page