सावंतवाडी /-

लायन्स क्लब ऑफ सावंतवाडीच्या वतीने २५ ऑक्टोंबर रोजी तालुकास्तरीय पीस पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ११ ते १३ वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या मनावर जागतिक शांतता आणि बाउधिक विकासाचा प्रभाव पडून स्पर्धात्मक परीक्षेचा अनुभव प्राप्त होणे हा या मागचा हेतू आहे. या स्पर्धेत तालुक्यातील जास्तीत जास्त शालेय विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन लायन्स क्लब अध्यक्ष अँड परिमल नाईक यांनी केले आहे. या स्पर्धेचे नियम पुढील प्रमाणे आहेत. १) काढलेली चित्रे दिनांक २५/१०/२०२१ पर्यंत सुषमा एंटरप्रायझेस, मेन रोड, सालईवाडा, सावंतवाडी, ता. सावंबत्ताडी. जि. सिंधुदुर्ग येथे जमा करावी. २) कागदाचा आकार – चित्र शक्यतो १३×२० इंचापेक्षा (३३×५० सेमी) छोटे असू नये. तसेच २०×२४ इंचापेक्षा (५०×६० सेमी.) मोठेही असू नये. याशिवाय त्याला फ्रेम अथवा लॊमनेशन केलेले नसावे. हाफ साईज ड्राइंग पेपर (A2) योग्य राहील. ३) स्पर्धेची बक्षिसे – प्रांतपालाकडुन येणाऱ्या चित्रांमधुन एक चित्र निवडुन (मल्टिपल)कडे बहुप्रांत प्रमुखांकडे पाठविण्यात येईल आणि तिथुन एक चित्र निवडुन आंतरराष्ट्रीय लायन्य संघटनेकडे पाठविले जाईल. महाविजेत्यासाठी US$500 अॅवॉर्ड तसेच विजेता आणि दोन सदस्यांसाठी (एक पालक व क्लब अध्यक्ष अथवा एक सदस्य) यांना अॅवॉर्ड सेरेमनीसाठी मोफत ट्रीन, २३ उपविजेते- मेरीट अॅवॉर्ड US$500 आणि प्रमाणपत्र मिळेल. ही सर्व २४ पोस्टर्स पुढील आंतरराष्ट्रीय कनव्हेशन मध्ये प्रदर्शित करण्यात येतील. ४)चित्रांसाठी वॉटर कलर, के ऑन कलर किंवा पेस्टल कलर चा वापर करावा. ५)चित्राच्या मागे नाव, वय, शाळा, इयत्ता, यांचा पेन्सीलने उल्लेख करावा. ६) काही शंका असल्यास भ्रमणयंत्र क्र. ९४२२३७३३८६ या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन अध्यक्ष अँड परिमल नाईक यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page