मुंबई /-

शिवसेनेचा दसरा मेळावा हा मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर होत असतो. मात्र करोना संकटामुळे यंदा हा मेळावा शिवाजी पार्कऐवजी माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहामध्ये होणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली.

दरवर्षी होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले असते. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा हा दसरा मेळावा होणार की नाही याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र संजय राऊत यांनी दसरा मेळावा होणार असल्याचे स्पष्ट केले होते. आज त्यांनी दसरा मेळाव्याच्या जागेबाबत माहिती दिली आहे. संजय राऊत म्हणाले, शिवसेनेचा दसरा मेळावा 100 टक्के होणार आहे. षण्मुखानंद हॉलमध्ये त्याच जोरात हा मेळावा होईल. शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करतील आणि देशाच्या राजकारणाला दिशा देण्याचा प्रयत्न करतील.गतवर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात दसरा मेळावा पार पडला होता. मात्र यंदाचा दसरा मेळावा मांटुग्याच्या षण्मुखानंद सभागृहात पार पडणार आहे.

▪️ या मेळाव्याला सभागृहाच्या क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती असेल. शिवसेनेचे सर्व वरिष्ठ नेते उपनेते, मंत्री, मुंबईचे आमदार, महापौर आणि मुंबई महानगरपालिकेतले काही काही महत्वाचे नगरसेवक या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page