वेंगुर्ले
उत्तर प्रदेश लखीमपूर खिरी येथे हिंसाचारात शेतकऱ्यांच्या झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ वेंगुर्ले तालुका महाविकास आघाडीच्या वतीने आज तहसिलदार वेंगुर्ले यांना निवेदन देण्यात आले.यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उत्तर प्रदेशातील लखीमपुर खीरी येथे केंद्र सरकार मधील गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचे पुत्र आशिष मिश्रा यांनी शेतकऱ्यांच्या मोर्चातील समूहावर जाणीवपूर्वक गाड्या घालून शेतकऱ्यांच्या हत्या केल्याची घटना घडलेली आहे. या गंभीर घटनेची दखल घटनात्मक पंतप्रधान म्हणून घेतलेली नाहीच. उलट गुन्हेगारांना अभय देण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. तसेच उत्तर प्रदेशातील लखीमपुर-खीरी येथे तेथील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या माध्यमातून राजरोज गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही याची दखल घेतलेली आहे.परंतु गुन्हेगार अद्यापही मोकाट असून कायदा हातात घेऊन आहेत. मोदी शासन त्यावर कोणतीही भूमिका स्पष्ट करीत नाही. हा कायदा व सुव्यवस्था हातात घेतल्याचा हिटलरी प्रकार आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील समाविष्ट आम्ही सर्व पक्षाचे समन्वयक या दडपशाहीचा जाहीर निषेध करतो. तसेच दोषींवर कठोर कारवाईची मागणी गांभीर्याने केंद्र शासनाकडे करीत आहोत. आपण प्रशासनाचे महत्वाचे घटक या घटनात्मक नात्याने आमच्या न्याय्य प्रक्षुब्ध भावना केंद्र सरकारपर्यंत पोहोचाव्यात, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी प्रांतिक सदस्य एम.के गावडे,काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इर्षाद शेख,शिवसेना तालुका प्रमुख यशवंत परब, उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे, शिवसेना शहरप्रमुख अजित राऊळ, काँग्रेस शहर अध्यक्ष प्रकाश डिचोलकर,नगरसेवक संदेश निकम,
राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष
सत्यवान साटेलकर,
ओ बी सी सेल जिल्हाध्यक्ष जगन्नाथ डोंगरे, नितीन कुबल, प्रज्ञा परब, नम्रता कुबल,नगरसेविका अस्मिता राऊळ, नगरसेविका कृतिका कुबल,नगरसेवक आत्माराम सोकटे, रोहन वराडकर, विवेकानंद आरोलकर, संदीप केळजी,तालुका युवासेना प्रमुख पंकज शिरसाट, वामन कांबळे, हेमंत मलबारी, सुरेश भोसले, प्रशांत परब,स्वप्निल रावल यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page