जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती डॉ. दळवी यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन..

दोडामार्ग /-

पुणे येथील राजहंस प्रकाशन या प्रकाशन संस्थेच्या वतीने दोडामार्गमधील पुस्तकप्रेमींसाठी महाराजा हॉल दोडामार्ग येथे पुस्तक प्रदर्शनातून सुवर्णसंधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परीषद आरोग्य व शिक्षण सभापती डॉ.अनिषा दळवी यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.यावेळी भाजप तालुकाअध्यक्ष प्रविण गवस,दोडामार्गमधील प्रतिष्ठित नागरीक गुरुदास मणेरीकर,ज्ञानेश्वर झोरे,राजहंस प्रकाशन संस्थेच्या मुग्धा मणेरीकर,सचिन मणेरीकर आदी उपस्थित होते.

आजच्या धकाधकीच्या जीवनात लुप्त होत चाललेल्या वाचन कलेची आवड वृध्दिंगत व्हावी,मोबाईलच्या युगात लहान मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी अशा पुस्तक प्रदर्शनाचा जास्तीत जास्त लाभ पुस्तकप्रेमी व पालकांनी घ्यावा असे आवाहन डॉ.दळवी यांनी यावेळी केले.

दिलीप माजगावकर सर्वेसर्वा असलेल्या राजहंसच्या प्रकाशन संस्थेच्या महाराष्ट्रात ९ शाखा असून गोव्यातली ही १० वी शाखा आहे. गोव्याबरोबरच सिंधुदुर्गमधेही पुस्तक वितरण,शाळा,वाचनालयांना सवलतीत पुस्तक वितरण,सांस्कृतिक कार्यक्रम,वाचक लेखक संवाद करण्याचा हेतू यावेळी संस्थेच्या मुग्धा मणेरीकर यांनी बोलून दाखविला.

सदर पुस्तक प्रदर्शन हे दोन दिवसांसाठी असून यात राजहंस,समकालीन या नामवंत प्रकाशकांच्या उत्तमोत्तम कथासंग्रह,कादंबरी,प्रवासवर्णने त्याचप्रमाणे जोत्स्ना प्रकाशनची लहान मुलांची,आकर्षक रंगीबेरंगी चित्रे असलेली मराठी व इंग्रजी पुस्तके उपलब्ध होणार असून निवडक पुस्तकांवर २०% पर्यंत सवलत देण्यात येत आहे.तरी जास्तीत जास्त पुस्तक प्रेमींनी या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page