महाराष्ट राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांना देण्यात आले लेखी निवेदन..

सिंधुदुर्ग /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुचर्चित चिपी विमानतळाचे उद्घाटन शनिवार दि.९ ऑक्टोबर रोजी होत असून,सदर उदघाटन समारंभ कोरोना पार्श्वभूमीवर मर्यादित स्वरूपात होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.परंतू या कार्यक्रमास मुख्यमंत्री,केद्रिंय नागरी विमान वाहतूक मंत्री, केंद्रीय सुक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री, उपमुख्यमंत्री,महसुल मंत्री,उद्योग मंत्री,पालकमंत्री,उद्योग राज्यमंत्री,लोकसभा सदस्य,माजी केंद्रीय मंत्री,विधानसभा तसेच विधानपरिषद सदस्य तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमास जिल्ह्यातील पत्रकार तसेच युटूब,सोशल मिडिया यांनाही प्रवेश मिळणार नसल्याचे समजल्याने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांसमवेत जिल्हा माहिती अधिकारी व माहिती सहाय्यक अधिकारी यांना यासंदर्भात विचारणा केली असता, त्यांनी दिशाभूल करणारी माहिती देत उडवा उडवीची उत्तरे दिली,यावेळी उपस्थित पत्रकारांनी कुठल्या तरी दोन केबलवर चालणारे खाजगी मिडियाला परवानगी दिली असल्याचे समजते.सदर मिडीयाना प्रवेश पत्र दिले जाते व इतरांना का नाही.याचा जाब विचारला व एकाला एक न्याय व एकाला एक न्याय या वृत्तीचा निषेध व्यक्त केला. या नंतर पत्रकारांनी खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांना आंजिवडे घाट पाहणी दरम्यान भेट घेत याबाबत निवेदन दिले.यावेळी खासदार राऊत यांनी फक्त ३५ पत्रकारांना प्रवेश दिला जाणार असल्याचे सांगत यात मुंबईतील पत्रकारांचा समावेश असणार असल्याचे सांगितले.यावेळी उपस्थित सोशल मिडीया व युटूबवरील पत्रकारांनी शनिवारी खासदार आमदार यांच्या आंजिवडे घाट पाहणी दौ~यावर बहिष्कार टाकत तिव्र नाराजी व्यक्त केली होती.

यानंतर पत्रकारांनी तातडीची बैठक घेत कोरोना पार्श्वभूमीवर जर कार्यक्रम निमंत्रितात होत असेल तर कोरोना काळात आँनलाईन कार्यक्रमांचा अट्टहास धरणारे सत्ताधारी तसेच खासदार आमदार आता या कार्यक्रमात स्वताःउपस्थित कसे राहतात? विमानतळ उदघाटन प्रसंगी कोरोना विषयक सर्व नियम अटी पाळून कार्यक्रम होणार का? कोरोना कालावधीत सरकार आणि सर्व सामान्य जनता यांच्यातील महत्त्वाचा दुवा समजल्या गेलेल्या सोशल मिडिया,युटूब,वेब यावरील पत्रकार यांची फक्त चिपी विमानतळ उदघाटन प्रसंगी ऍलर्जी का? जिल्ह्यात विविध पक्षांच्या बैठका मेळावे कार्यक्रम जोरदार सुरू आहेत. यावेळी कोरोना दिसत नाही का ? असे प्रश्न उपस्थित केले.तसेच विशिष्ठ तसेच मर्जीतील एक दोन खाजगीतील युटूब व केबलवरील मिडिया ना प्रवेश पत्र मिळते व इतरांना नाही हा कोणता न्याय? व कोणत्या निकषावर दिले जाते? यावर तिव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

तर सोमवारी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकारा संघाच्या वतीनं जिल्हाधिकारी,पालकमंत्री,खासदार यांना याबाबत लेखी निवेदन देण्यात आले आहे.जर चिपी विमानतळ उदघाटन सोहळ्यात पत्रकारांना प्रवेश न दिल्यास मराठी पत्रकार संघाच्या वतीने तसेच युटूब चॅनल व सोशल मिडीया पत्रकारांच्या वतीने काळी फित लावून धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.तर जिल्हा माहिती अधिकारी व सहाय्यक माहिती अधिकारी यांच्यावरही कारवाई करावी अशीही मागणी करण्यात आली आहे.तसेच या पुढे जिल्ह्यातील खासदार आमदार मंत्री यांच्या कार्यक्रमांना बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांनी दिला आहे.यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर, उपाध्यक्ष समील जळवी,कुडाळ तालुका सचिव मिलिंद धुरी, आनंद कांडरकर आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page