कुडाळ /-

चिपी विमानतळ उद्घाटनासाठी मुंबईचे पत्रकार हवे मग स्थानिक बातम्या झटपट पोचवण्यासाठी जिल्ह्यातील युट्यूब व सोशल मीडीया यांना का लागते? तेव्हाही मुंबईतूनच पत्रकार बोलवा, हे दौरे श्रेयवादासाठीच.

खासदार विनायक राऊत यांचे दौरे श्रेयवादासाठी असतात, हे त्यांच्या आजच्या कृतीतून दिसून आले. सोशल मीडियाचे पत्रकार केवळ झटपट प्रसिद्धीकरिता हवे असतात, हे त्यांनी आज माणगाव येथील राधाकृष्ण हॉल येथे स्वतःहून दाखवून दिले. त्यामुळे चिपी विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या पाठोपाठ आंजिवडे-पाटगाव घाट रस्त्याच्या पाहणी दौऱ्यावर देखील बहिष्कार टाकण्यात आल्याचे सोशल मीडियाच्या पत्रकारांकडून सांगण्यात आले.

सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या आंजिवडे पाटगाव घाट रस्त्याच्या पहाणी दौऱ्यानिमित्त खासदार विनायक राऊत व त्यांच्यासोबत आमदार वैभव नाईक आले असता, त्यावेळी त्यांना ९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या चिपी विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता प्रवेशाचे परवाने देण्यासाठी जिल्हा माहिती अधिकारी यांनी नकार देऊन उडवाउडवीची उत्तरे दिल्याबद्दल सदर उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकण्यात आले असल्याचे निवेदन जिल्ह्यातील सोशल मीडिया पत्रकारांच्या वतीने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून देण्यात आले. मात्र आंजिवडे येथे जाण्यासाठी उतावीळ झालेल्या खासदार राऊत, आमदार नाईक यांनी सोशल मीडिया पत्रकारांचे निवेदन धावपळीत स्वीकारले.

पत्रकारांनी तासनतास यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी वाट बघावी परंतु पत्रकारांबरोबर बोलण्यासाठी यांच्याकडे वेळ नाही हि शोकांतीका.

दरम्यान मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ३५० पत्रकारांपैकी फक्त ३५ पत्रकारांना चिपी विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमाला प्रवेश देण्यात येणार असल्याचे खासदार राऊत यांनी सांगताच, उरलेल्या ३१५ पत्रकारांनी काय करायचे अशी विचारणा केली असता खासदार राऊत निरुत्तर होऊन निघून गेले.

पत्रकारांना न घेताच दौ-यासाठी निघून गेले

मात्र खासदार राऊत, आमदार नाईक यांच्या निघून जाण्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटातच त्यांच्याच एका कार्यकर्त्याचा सोशल मीडियाच्या पत्रकारांना फोन आला की, “काहीपण करा, आंजिवडे-पाटगाव घाट रस्त्याच्या पाहणीच्या ठिकाणी पोहचा” यावरून लक्षात येते की, खासदार राऊत यांचे दौरे केवळ प्रसिद्धी करिता असतात. त्यांच्या दौऱ्याची बातमी प्रसिद्ध करून गाजावाजा करण्यासाठी सोशल मीडिया पत्रकारांची गरज असते या त्यांच्या वागण्याची किव आल्यामुळे खासदार राऊत यांच्या आजच्या आंजिवडे-पाडगाव रस्त्याच्या पहाणी दौऱ्यावर सोशल मीडियाच्या पत्रकारांकडून बहिष्कार टाकण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page