वेंगुर्ला /-


महात्मा गांधी जयंती निमित्त प्रत्येक तालुक्यात,गावामध्ये विविध उपक्रम करुन गांधी जयंती साजरी करावी, असा भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाच्या संकल्पनेनुसार शिरोडा गांधीनगर येथे स्वातंत्रपूर्व काळात त्यांच्या अनुयायी कडून मिठाचा सत्याग्रह झाला होता. म्हणून परत एकदा उजाळा मिळावा व तेथे गांधी स्मारक उभारणीचे प्रत्यत्न चालू आहे व या संदर्भात सरकारकडे पाठपुरावा व्हावा व या प्रयत्नाना यश मिळण्यासाठी त्या नियोजित गांधी स्मारक ठिकाणी आज २ आॅक्टोबर २०२१ च्या महात्मा गांधी जयंती दिनी त्या ठिकाणी भाजप वेंगुर्ला तालुक्याच्या वतीने महात्मा गांधीच्या प्रतिमेस भाजप सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई व रेडी जि.प.सदस्य व माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांच्या हस्ते पुष्पहार घालून महात्मा गांधी जयंती साजरी केली. शिरोडा गावातील ज्येष्ठ पत्रकार अनिल निखार्गे व भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी मनोहर होडावडेकर गुरुजी यांनी स्वातंत्र पूर्व काळात या ठिकाणी झालेल्या मिठाच्या सत्याग्रहाविषयी व यामध्ये ज्याचे योगदान होते त्यांच्या आठवणी सांगून मिठाच्या सत्याग्रहांच्या स्मृतीला उजाळा दिला. यावेळी स्मारक समितीचे सदस्य डाॅ.प्रसाद साळगांवकर उपस्थित होते. यावेळी तालुक्याच्यावतीने तालुका सरचिटणीस बाबली वायगंणकर,तालुका उपाध्यक्ष मनवेल फर्नाडिस,लक्ष्मीकांत कर्पे,जिल्हा कार्यकारणी सदस्य साईप्रसाद नाईक,जिल्हा व तालुका मच्छीमार आघाडी अध्यक्ष दादा केळूस्कर,शिवा उर्फ बाबा नाईक,मच्छीमार नेते वसंत तांडेल,तालुका चिटणीस सुजाता देसाई,समिर चिदरकर,भाजप पदाधिकारी गुरु घाडी,युवा मोर्चाचे पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्य संकेत धुरी,तालुका सदस्य रवि शिरसाट आदी उपस्थित होते. त्याच प्रमाणे आसोली,आरवली,शिरोडा, शक्ती केद्र प्रमुख विजय बागकर,महादेव नाईक, विदयाधर धानजी, सरपंच मनोज उगवेकर,उपसरपंच राहुल गावडे,ग्रामपंचायत सदस्य दिलीप गावडे,समृद्धी धानजी,प्राची नाईक,वेदिका शेटये,माजी जिल्हा अध्यक्ष व महिला आघाडी जिल्हा कार्यकारी सदस्य निकिता परब,भाजप शिरोडा शहर अध्यक्ष श्रीकृष्ण धानजी,उपाध्यक्ष संतोष अणसूरकर,सरचिटणीस सुरेश म्हाकले,माजी विभागीय अध्यक्ष बाळकृष्ण परब,विभागीय अध्यक्ष अमित गावडे,माजी सरपंच विजय पडवळ,भाजप शिरोडा शहर पदाधिकारी अनिल गावडे,जयानंद शिरोडकर,साईराज गोडकर,दादा शेटये,योगेश वैदय,विश्वनाथ नाईक,राजेद्र भोपाळकर,नंदू धानजी,ज्येष्ठ पदाधिकारी हरिश्चंद्र परब,तालुका महिला पदाधिकारी गंधाली करमळकर,भाजप शिरोडा शहर महिला आघाडी अध्यक्ष संध्या राणे,भाजप शिरोडा शहर महिला पदाधिकारी शुभांगी शिरोडकर,भोमवाडी भाजप पदाधिकारी नंदकुमार निखार्गे,पत्रकार दिपेश परब,रेडी ग्रामपंचायत सरपंच रामसिंग राणे,ग्रामपंचायत सदस्य विनायक नाईक,शैलेश तिवरेकर,भाजप रेडी ग्राम कमिटी पदाधिकारी देवेंद्र मांजरेकर,एकनाथ गवंडी,गजानन बांदेकर,देवेंद्र राऊळ,महिला पदाधिकारी श्रध्दा धुरी,तालुका सदस्य महेश कोनाडकर,आरवली सरपंच तातोबा कुडव,ग्रामपंचायत सदस्य समिर कांबळी,सायली कुडव,शिला जाधव,जिल्हा आय.टी.प्रमुख केशव नवाथे,भाजप आरवली ग्राम कमिटी पदाधिकारी विश्वनाथ उर्फ भाई शेलटे,पपू चिपकर,राहुल नाईक,उत्कर्ष जोशी,मिलिंद पेडणेकर,साईल कांबळी,ललित कांबळी,सौरंभ कांबळी,गौतम सावळ,ब्रम्हानंद टाककर,सागरतीर्थ बूथ क्रमांक ७७ चे अध्यक्ष देंवेद्र उर्फ बाळू वस्त,सागरतीर्थ ग्रामपंचायत सदस्य गायत्री गोडकर,सागरतीर्थ ग्राम कमिटी भाजप पदाधिकारी प्रविण गोडकर,कामील फर्नाडिस,आशिष डिसोझा व रेडी जि.प.विभागातील रेडी,शिरोडा,आरवली,सागरतीर्थ,व आसोली,येथील भाजप पदाधिकारी,बूथ अध्यक्ष,सदस्य,कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. या वेळी नियोजित गांधी स्मारक येथे परिसराची स्वच्छता करुन स्वच्छता अभियान हा उपक्रम राबविला. त्यानंतर नियोजित गांधी स्मारक येथून तिरंगा यात्रा शिरोडा गांधीचौक बाजारपेठ,एस्.टी. स्टॅण्ड,शिरोडा बाजापेठ, बायपास गायकवाड हाॅस्पीटल त्यानंतर शिरोडा बायपास मार्गे रेडी ग्रामपंचायत व नंतर नियोजित गांधीस्मारक शिरोडा गांधीनगर (राऊतवाडा) पर्यत मोटरसायकल रॅली काढण्यात आली. तिरंगा रॅलीच्या रथामध्ये नरेंद्र महाराज संप्रदायचे श्रीकृष्ण उगवेकर यांनी महात्मा गांधी यांची वेशभूषा करुन उबेहुब त्यांची प्रतिमा साकारली होती या उपक्रमामुळे शिरोडा येथे उत्साहाचे वातावरण होते व ग्रामस्थांच्या वतीने कौतुक करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page