वेंगुर्ला /-


वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे पुरविण्यात येणा-या सेवा व योजनांचा लाभ घेणे सोईची व्हावे तसेच स्वच्छता अभियानांतर्गत होणारे विविध कार्यक्रम व सुविधांच्या माहितीसाठी बनविण्यात आलेल्या ‘घंटागाडी व वेंगुर्ला नगरपरिषद‘ या अॅपचे अनावरण आज नगरपरिषदेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या मोबाईल अॅप्लिकेशनचा उपयोग शहरातील कचरा संकलन सहज होण्यास व शहरातील मालमत्तांचा आढावा घेण्याकरीता होणार आहे. हे अॅप्लिकेशन देशभरात चालू असलेल्या स्वच्छ सर्व्हेक्षण स्पर्धेमध्ये वेंगुर्ला शहराला देशपातळीवर स्थान उंचावण्यासाठी लाभदायी ठरणार आहे.यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, स्वच्छता संदेश दूत सुनिल नांदोस्कर, मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे, वैद्यकीय अधिक्षक डॉ.अतुल मुळे, वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ.बी.एन.सावंत, नगरसेवक प्रशांत आपटे व नगरसेविका शितल आंगचेकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page