कुडाळ /-

,कुडाळ येथे बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या फिजिओथेरपी महाविद्यालयातर्फे बॅ.नाथ पै जन्मशताब्दी वर्षानिमित्त कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू कोरोना चा प्रसार रोखण्यासाठी बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले असून कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी फिजिओथेरपी महाविद्यालयातर्फे कोरोना प्रतिबंधक लस केंद्र सुरू केले आहे. त्याचे उद्घाटन ‌उमेश गाळवणकर यांच्याहस्ते विविध अभ्यासक्रमाचे प्राचार्य, प्राध्यापक यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. तसेच कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या व्यक्तींना काजूचे रोप देत प्रमाणपत्राचे वितरणही करण्यात आले. यावेळी बॅ.नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुरज शुक्ला, डॉक्टर प्रगती शेटकर, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. मीना जोशी, उपप्राचार्य कल्पना भंडारी, प्रा. वैशाली ओटवणेकर, महिला महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज,बी.एड महाविद्यालयाचे प्राचार्य परेश धावडे.बॅरिस्टर नाथ पै ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य अर्जुन सातोस्कर , व महाविद्यालयाचे विविध प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने कोरोनाग्रस्त रुग्णांची सेवा करण्यासाठी बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेने आपल्या शिक्षण संस्थेची इमारत या अगोदर कोरोना केअर सेंटर साठी दिली होती. तेथे अनेक भागातील रुग्णांनी योग्य उपचार घेऊन आपले जीवन सुकर केले. जवळजवळ २३० सदर लोक सेंटरमध्ये यशस्वी उपचार करून स्वगृही परतले .याच सामाजिक कार्याची पुढची पायरी म्हणजे कोरोना होऊच नये यासाठी सरकारने उचललेल्या लसीकरण मोहिमेसाठी हातभार लावताना चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या पुढाकाराने बॅरिस्टर नाथ पै जन्मशताब्दी वर्षानिमित्त बॅ.नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या व नर्सिंग महाविद्यालयाच्या सहकार्याने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे केंद्र सध्या सुरू केले असून .विविध भागातील लोक याचा लाभ घेत आहेत .त्यांच्या या कार्याबद्दल जनसामान्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page