आचरा /-

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती आणि भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री जयंती या दिनाचे औचित्य साधून बिडये विद्यामंदिर केंद्रशाळा आचरे नं .१ येथे बॅ .नाथ पै यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा आचरे प्रभागात शुभारंभ करण्यात आला

.या कार्यक्रमाचे आयोजन बॅ .नाथ पै सेवांगण मालवण आणि साने गुरुजी कथा माला मालवण यांनी संयुक्तरित्या केले होते .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना मा .प्रकाश पेडणेकर माजी मुख्याध्यापक ज्ञानदिप हायस्कूल वायंगणी ता .मालवण म्हणाले “बॅ .नाथ पै यांचे अमोघ वक्तृत्व ,जनतेशी बांधिलकी ,प्रेम ,बहुश्रुतता हे गुण विद्यार्थ्यांपासून पालकांपर्यंत आणि सामान्य मतदारापासून त्यांच्या पुढा-या पर्यंत सर्वांनी घेणे आवश्यक आहे ,तरच भारताच्या संविधानाचा लोकशाहीचा पाया भारतदेशी मजबूत होईल असे सांगितले. या वेळी त्यांच्या सोबतव्यासपीठावर प्रकाश पेडणेकर ,रविंद्र मुणगेकर ,मनोज गिरकर ,सुगंधा गुरव,स्मिता जोशी ,मनाली फाटक,पांडुरंग कोचरेकर ,सुरेश ठाकूर .
.तसेच नवनाथ भोळे ,संजय परब ,सायली परब ,संजय जाधव ,श्रुती गोगटे ,अरुण आडे ,भावना मुणगेकर ,कामिनी ढेकणे ,संजय रोगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते .
या वेळी साने गुरुजी कथामाला कार्यकर्ते रामचंद्र कुबल आणि सुगंधा गुरव यांनी अनुक्रमे बॅ .नाथ पै आणि महात्मा गांधी ,लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्याचे अभिवाचन केले .नाथ पै सेवांगण कुटुंबकल्याण केंद्राचे समुपदेशक मनोज गिरकर यांनी नाथ पै सेवांगण आणि समुपदेशन केंद्र यांची माहिती दिली .
या वेळी आचरे प्रभागातील गरीब होतकरु अशा २७ मुलामुलींना नाथ पै सेवांगण यांच्या वतीने शैक्षणिक प्रोत्साहनपर मदत निधीचे वाटप करण्यात आले .तसेच साने गुरुजी कथामाला मालवणच्या वतीने कल्पना मलये लिखित “कारटो”ह्या मालवणी कादंबरीचे वितरण करण्यात आले .तर उपस्थित पालकांना साने गुरुजी कथामालेच्या वतीने ग्रंथ भेट देण्यात आली .आचरे प्रभागातील वाचन मंदिरांना अध्यक्षांच्या हस्ते मा .खासदार विनायक राऊत यांनी दिलेली ग्रंथ भेट “सिंधू साहित्य सरिता “ह्या पुस्तकाचे वाटप करण्यात आलेसदर कार्यक्रमाला आचरे पंचक्रोशीतील बहुसंख्य शिक्षक ,विद्यार्थी ,पालक उपस्थित होते ..कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रामचंद्र कुबल यांनी आणि पांडुरंग कोचरेकर यांनी सर्वांचे आभार मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page