सावंतवाडी /-

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सावंतवाडी नगरपरिषदेच्या स्वच्छ सर्व्हेक्षण 2022 अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महात्मा गांधी, लालबहादुर शास्त्री यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना शहर स्वच्छतेची शपथ देण्यात आली. यावेळी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सफाई मित्रांचा सत्कार करण्यात आला. तसेच आरोग्य कर्मचारी दीपक म्हापसेकर, पूर्वा मसुरकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांनी सावंतवाडी शहराचे ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून भगिरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर यांची घोषणा केली.

डॉ. प्रसाद देवधर, माजी आरोग्य सभापती ॲड. परिमल नाईक यांचा नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. डॉ. प्रसाद देवधर यांच्या माध्यमातून शहर स्वच्छता कामास अधिक गती प्राप्त होईल असा विश्‍वास संजू परब यांनी व्यक्त केला. यावेळी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांनी स्वच्छ सर्व्हेक्षण 2022 मागचा हेतू विशद करत सावंतवाडी शहर स्वच्छतेत नंबर वन करण्याचा विश्‍वास व्यक्त केला.
यावेळी डॉ. प्रसाद देवधर यांनी मनोगत व्यक्त केले. प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी कापडी पिशव्या नगरपरिषद कर्मचाऱ्यांना भेट देत कृती युक्त मार्गदर्शन केले. तसेच सावंतवाडी शहर स्वच्छ होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी उपनगराध्यक्ष सौ. अन्नपूर्णा कोरगावकर, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, माजी आरोग्य सभापती ॲड. परिमल नाईक, नगरसेवक आनंद नेवगी, दिपाली भालेकर, ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक, लायन्स क्लबचे अशोक देसाई, अमेय पै, बाळ बोर्डेकर, अरविंद पोपकर, विद्याधर तावडे, आसावरी शिरोडकर, रसिका नाडकर्णी, वैभव नाटेकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page