सिंधुदुर्गनगरी /-

शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे 7 ऑक्टोबर पासून सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी मानक कार्यप्रणाली/मार्गदर्शक तत्वे आज जारी केली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे दिनांक ०७ ऑक्टोबर, २०२१ पासून खुली करणेसाठी सोबतच्या परिशिष्ट – अ मध्ये नमुद मानक कार्यप्रणाली / मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करणेच्या अटीस अधीन राहून परवानगी देण्यात येत आहे.

प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील धार्मिक आणि प्रार्थना स्थळांच्या वेळेबाबत संबंधीत विश्वस्त/ मंडळ/ अधिकारी यांनी निर्णय घेण्याचा आहे. मास्क परिधान करणे, शारीरिक आंतराचे पालन करणे, थर्मल स्क्रिनिंग करणे आणि वारंवार हात धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर8 करणे बंधनकारक राहील. सर्व सबंधीत प्रतिबंधीत क्षेत्रा बाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे यांच्याकडून परिशिष्ट – अ मध्ये नमुद मानक कार्यप्रणाली / मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याबाबत तपासणी करण्याचे अधिकार त्या त्या क्षेत्रातील पोलीस अधिकारी/कर्मचारी व स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात येत आहेत. यापूर्वी कोविड -१९ व्यवस्थापनासाठी या कार्यालयाकडून विहित केलेले दिनांक १२ ऑगस्ट, २०२१ रोजीचे, आदेश आणि त्यात उल्लेख असलेल्या बाबी या सर्व निर्बंधासह पुढील आदेश होईपर्यंत तशाच लागू राहतील. उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता १८६० (४५) च्या कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असा इशाराही जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिला आहे. परिशिष्ट अ धार्मिक स्थळे / प्रार्थना स्थळे या ठिकाणी होणारा कोव्हीड -19 विषाणू संसर्ग रोखण्यासाठीच्या मानक कार्यप्रणाली / मार्गदर्शक सूचना 1) पार्श्वभूमी – धार्मिक स्थळे / प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी मोठया संख्येने लोक एकत्र येत असतात. अशा ठिकाणी / ठिकाणांच्या आवारात कोव्हीड -19 विषाणू संसर्ग रोखण्यासाठी योग्य सामाजिक अंतर / इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना यांचे काटेकोरपणे पालन करणे महत्वाचे आहे. 2) व्याप्ती – या आदेशामध्ये कोव्हीड -19 विषाणू संसर्ग रोखण्यासाठी करावयाच्या सामान्य प्रतिबंधात्मक उपायासोबतच या विशिष्ट ठिकाणी करावयाच्या विशिष्ट उपाययोजनांचा ही समावेश करण्यात आलेला आहे. कन्टेनमेंट झोनच्या आतील धार्मिक स्थळे / प्रार्थना स्थळे ही नागरिकांसाठी बंद राहतील. फक्त कन्टेनमेंट झोनच्या बाहेरील धार्मिक स्थळे / प्रार्थना स्थळे सुरू करण्यास परवानगी असेल. 3) सामान्य प्रतिबंधात्मक उपाययोजना – 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, इतर आजाराने ग्रस्त व्यक्ती, गरोदर महिला आणि 10 वर्षाखालील लहान मुले यांनी घरीच राहण्याबाबत सल्ला देण्यात येत आहे. धार्मिक / प्रार्थना स्थळांचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्था यांनी याबाबत नागरिकांना सूचना द्याव्यात. कोव्हीड -19 विषाणू संसर्गाचा सामान्य प्रतिबंधात्मक उपाययोजनां बरोबरच साध्या सार्वजनिक आरोग्य उपायांचेही पालन करणे आवश्यक आहे. या सर्व उपायांचे पालन सर्व धार्मिक स्थळे / प्रार्थना स्थळे या ठिकाणी सर्व कामगार / सेवेकरी / अभ्यागत / भाविक यांच्याकडून पूर्ण वेळ पालन करणे बंधनकारक आहे. यामध्ये खालील प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा समावेश असेल.

I) या सर्व सार्वजनिक ठिकाणी शक्यतोवर वैयक्तिक कमीत कमी 6 फूट शारीरिक अंतर राखणे आवश्यक असेल. II) चेहरापट्टी / मास्क यांचा वापर करणे बंधनकारक असेल. III) हात अस्वच्छ नसले तरी साबणाने वारंवार हात धुणे (किमान – 40 ते 60 सेंकदापर्यत) बंधनकारक असेल. त्याचबरोबर सर्व ठिकाणी अल्कोहोल युक्त हॅण्ड सॅनिटायझर चा वापर (किमान 20 सेंकदापर्यंत) करावा. IV) श्वसनसंबंधित शिष्टाचाराचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असेल. यामध्ये शिंकताना किंवा खोकताना टिश्यू पेपर किंवा हातरूमाल वापरावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page