वेंगुर्ला /-


आरोग्य विभागाची गट क व गट ड वर्ग परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून शुक्रवारी रात्री अचानक जाहीर केले.त्यामुळे परीक्षार्थी संताप व्यक्त करीत आहेत. परीक्षा २ दिवसांवर येऊन ठेपली असल्याने उमेदवारांनी पूर्णपणे तयारी केली होती. मात्र ही परीक्षा अचानक रद्द करून या शासनाने मुलांच्या चेहऱ्यावर निराशा पसरविली आहे.कोणताही रोजगार देऊ शकत नसणाऱ्या या सरकारने मुलांची चेष्टा चालविली आहे.
शासनाने अचानकपणे पुढे ढकललेल्या या परीक्षा पुन्हा कधी घेण्यात येईल, याबाबत सध्यातरी कोणतीही माहिती देण्याता आलेली नाही. मात्र, परीक्षा मेसेजद्वारे हा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. परीक्षा दोन दिवसांवर असताना हा निर्णय घेतल्यामुळे परीक्षार्थीनी संताप व्यक्त केला आहे. अचानकपणे परीक्षा पुढे ढकलण्याचे नेमकं कारण समजले नसले तरी शासनाकडून नेहमीप्रमाणे तांत्रिक अडचणींचे तकलादू कारण पुढे केले जाणार आहे.
आरोग्य विभागाची गट क आणि ड वर्ग भरती परीक्षा अचानक काल रात्री रद्द झाल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्यात येताच या परीक्षेसाठी खूप आशा ठेऊन असलेल्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले. सिंधुदुर्ग मधील मुलांना कोल्हापूर, पुणे अशी सेंटर परीक्षेसाठी देण्यात आली होती. मुले कालपासून जाऊन त्या सेंटर चा बाजूला आपली रहाण्याची सोय स्वतः करून राहिली होती. मात्र या निर्णयामुळे त्यांचे मानसिक व आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाला जर काही अडचण होती तर त्यांनी अगोदरच ही परीक्षा होणार नसल्याचे जाहीर करायला हवे होते. आणि मुलांना कल्पना द्यायला पाहिजे होती,असे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी.तसेच मुलांचे आर्थिक नुकसान शासनाने भरून द्यावे आणि यापुढे मुलांचे परीक्षा केंद्र सिंधुदुर्ग येथे करण्यात यावी,अशी मागणी वेंगुर्ले तहसिलदार प्रविण लोकरे यांच्याकडे माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनी निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, उपसरपंच राहुल गावडे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप गावडे, शिरोडा माजी सरपंच विजय पडवळ आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page