मुंबई /-

● पंजाबमध्ये नेतृत्व बदल करत ज्येष्ठ नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याकडून मुख्यमंत्रिपद काढून घेतल्यानंतर आता काँग्रेसने अजून एका राज्यात नेतृत्व बदलाबाबत चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे.

● त्या पार्श्वभूमीवर राजस्थानमधील नेते सचिन पायलट हे मंत्री रघू शर्मा यांच्यासह दिल्लीत दाखल झाले आहेत. येथे राहुल गांधींच्या निवासस्थानी प्रियंका गांधींसोबत महत्त्वाची बैठक घेतली.

● दरम्यान, जयपूरमध्ये सचिन पायलट यांनी स्पीकर सी.पी. जोशी यांच्याशीही चर्चा केली होती. सचिन पायलट यांना दिल्लीला बोलावून घेण्याची ही दुसरी वेळ आहे. पंजाबप्रमाणेच राजस्थानमध्येही मुख्यमंत्री बदलण्यात यावा, अशी मागणी सचिन पायलट यांचे समर्थक करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर या घडामोडीला महत्त्व आले आहे.

● राजस्थानमध्ये सरकारचे नेतृत्व आता सचिन पायलट यांच्याकडे सोपव पाहिजे, अशी पायलट यांच्या समर्थकांची मागणी आहे. सचिन पायलट मुख्यमंत्री बनावे ही काँग्रेस कार्यकर्तेच नाही तर जनतेचीही अपेक्षा आहे, असे राजस्थान काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि पायलट यांचे निकटवर्तीय राजेंद्र चौधरी यांनीही नुकतेच असे विधान केले होते.

● दरम्यान, गहलोत गटाकडूनही पलटवार करण्यात येत आहे. राजस्थानमध्ये नेतृत्व परिवर्तनाची गरज नाही, असे अशोक गहलोत गटाकडून सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page