कुडाळ /-

कोविड नंतरचे मुलांचे शिक्षण व साक्षरता, प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या नेमक्या जबाबदा-या व प्रेरणादायी विचार या विषयावर रोटरी क्लब ऑफ कुडाळ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आयोजित २६ सप्टेंबर रोजी महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे सकाळी ९.३० वा. या वेळेत कोव्हिडचे सर्व नियमांचे पालन करत “ज्ञानसिंधु शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळ ” आयोजन करण्यात आले आहे. असे रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष अभिषेक माने व इव्हेंटचे चेअरमन सचिन मदने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोविड नंतर मुलांच्या शिक्षणाबाबत शिक्षकांची नेमकी भूमिका कोणती असावी या विषयावर या प्रशिक्षण कार्यशाळेत पाठ्यपुस्तक मंडळाचे सदस्य, प्रसिद्ध लेखक व वक्ते श्री बाळासाहेब लिंबिकाई (सांगली) व शिक्षक रोटरी सदस्यांसाठी प्रेरणादायी विचार या विषयावर रोटरी क्लब ऑफ सांगलीचे तथा रोटरी डिस्ट्रिक्टचे काऊन्सलर लिट्सी वॉशचे श्री किशोर लुल्ला सिंधुदुर्ग जिल्हयातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना मार्गदर्शन करणार आहेत.

१० वी च्या विद्याथ्र्यौना अभ्यासक्रमावर आधारीत रोटरीने तयार केलेले आयडियल स्टडी अॅप विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे. या अॅपची किंमत १हजार १०० रू. आहे पण कुडाळ तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्हयातील ग्रामीण भागातील १ हजार विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ कुडाळ व रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल च्यावतीने मोफत देण्यात येणार आहे. तसेच इतर १० वींच्या विदयार्थ्यांना हे अॅप ३० सप्टेंबर पर्यंत अवघ्या ५० रु. उपलब्ध करुन दिले जाणार आहे. हे अॅप विद्यार्थ्यांना स्वतः हाताळण्यास सोपे असून ग्रामीण भागात व दुर्गम भागातही अल्प नेटवर्क मध्येही विद्यार्थी हाताळू शकतात.

या कार्यशाळेचे जिल्हा परिषद अध्यक्ष सौ संजना सावंत यांचे हस्ते उद्घाटन होणार असून श्री प्रजित नायर (मुख्यकार्यकारी अधिकारी जि प सिंधुदुर्ग), श्री सुनिल मंद्रुपकर, प्रभारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) जि प सिंधुदुर्ग, सौ सुनिता भाकरे (गटशिक्षणाधिकारी पं स कुडाळ) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ कुडाळ ने पुढाकार घेत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक यांचा आयोजनामध्ये सहभाग घेतला आहे. इव्हेंट चेअरमन म्हणून सचिन मदने व इव्हेंट कोआर्डिनेटर म्हणून गजानन कांदळगावकर यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष अभिषेक माने, असिस्टंट गव्हर्नर श्री शशिकांत चव्हाण, सेक्रेटरी अमित वळंजू, खजिनदार दिनेश आजगावकर, इव्हेंट चेअरमन सचिन मदने, इव्हेंट कोआर्डिनेटर गजानन कांदळगावकर, प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्गाचे जिल्हाध्यक्ष नितीन कदम, सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे सहसचिव श्री विवेकानंद बालम, श्री अशोक येजरे, शिक्षक समिती सिंधुदुर्गाचे राज्य उपाध्यक्ष श्री राजन कोरगावकर, कुडाळ तालुकाध्यक्ष श्री प्रसाद वारंग, सचिव श्री महेश कुमार, रोटरी क्लब ऑफ कुडाळ चे माजी अध्यक्ष प्रमोद भोगटे, सदस्य राकेश म्हाडदळकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page