सिंधुदुर्गनगरी /

जिल्ह्यात रेल्वे, बिल्डींग व अन्य बांधकाम खान व्यवसाय व खाद्यपदार्थ विकणाऱ्या परप्रांतीय कामगारांच्या लसीकरणासाठी आरोग्य विभागाने लसीकरण कार्यक्रम हाती घेतला आहे ज्या कामगाराना आपली कोव्हॅक्सीन, कोविशीलड लस घ्यावयाची आहे त्यानीआधार किंवा अन्य कोणताही पुरावा देऊन प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयात लस घ्यावी असे आवाहन जिल्हा परिषद आरोग्य सभापती डॉ. अनिशा दळवी यांनी केले आहे.

जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या माध्यमातून येथील स्थानिक जनतेसाठी लसीकरण कार्यक्रम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आला आहे, शासनाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या कोव्हकसीन आणि कोवी शिलड् या लस मधून पहिला व दुसरा डोस टप्प्या-टप्प्याने दिला जात आहे .उपकेंद्र ,ग्रामपंचायत स्तरापर्यंत हे लसीकरण कार्यक्रम सुरू आहे परंतु जिल्ह्यात खान व्यवसायिक, रेल्वे , बिल्डिंग कंट्रक्शन व अन्य बांधकाम व्यवसाय क्षेत्रात आणि भेळ खाद्यपदार्थ, हॉटेल क्षेत्रात अनेक परप्रांतीय व्यवसायिक कामगार लसीकरणापासून वंचित असल्याचे निदर्शनास आल्याने या शिवाय कातकरी व अन्य दुर्लक्षित समाजातील सुमारे 2 हजार 763 परप्रांतीय लसीकरणापासून वंचित असल्याचे निदर्शनास आले आहे यादृष्टीने आरोग्य विभागामार्फत या कुटुंबासाठी लसीकरण कार्यक्रम हाती घेण्याचा निर्णय घेतला असून काही भागात लसीकरण कार्यक्रम सुरू झाला आहे तसेच ज्या परप्रांतीयांचे लसीकरण झाले नाही याबाबतही आरोग्य विभागामार्फत माहिती घेण्याचे काम सुरू आहे त्याच बरोबर त्यांमधून कुटुंबातील महिला ,बालके, गरोदर माता लसीकरणाबाबत ची माहिती करण्याचे काम आरोग्य विभागाने सुरू केले आहे जिल्ह्यातील परप्रांतीयांसाठी आरोग्य विभागाने सुरु केलेल्या या लसीकरण कार्यक्रमांमध्ये ज्या परप्रांतीयांना लस द्यावयाची आहे त्यांनी आपला आधार कार्ड किंवा रेशन कार्ड व अन्य ओळख पत्र सादर करून या लसीकरण कार्यक्रमात सहभागी व्हावे जेणे करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कोरणा हद्दपार करण्यात व कोरणा मुक्त जिल्हा करण्यासाठी आपण सर्व परप्रांतीय वासियांनी सहकार्य करावे असे आवाहन आरोग्य सभापती अनिशा दळवी यांनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page