रत्नागिरी /-

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विलंब झालेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे निकाल 10 ऑक्टोबरपासून लागण्यास सुरूवात होणार आहे.

▪️ तसंच विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रांवर कोविडचा शेरा देण्यात येणार नाही,” असं स्पष्टीकरण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलं.तसंच परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा एका महिन्यात घेतली जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

उदय सामंत म्हणाले….

▪️ अंतिम वर्षात 1 लाख 16 हजार 400 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यापैकी 90 ते 92 टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेसाठी नोंद केली आहे.

▪️ उरलेले विद्यार्थी आपल्या नजीकच्या केंद्रात ऑफलाइन पद्धतीनं परीक्षा देणार आहे. त्यासाठी संपूर्ण यंत्रणाही सज्ज आहे.

▪️ ऑफलाइन पद्धतीनं परीक्षा घेताना विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. सर्व विभागांनी एकत्र येऊन पोलीस व महसूल विभागाला मदत करावी.

▪️ विद्यार्थ्यांना प्रश्नसंच, मॉक टेस्ट यानंतर काही कारणास्तव परीक्षा राहिल्या तर त्या तातडीनं घेण्यात येतील.

▪️ नापास विद्यार्थ्यांची परीक्षा तातडीनं महिन्याभरात घेतली जाईल आणि त्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात येईल.

▪️ पदवीच्या प्रमाणपत्रांवर कोविडचा शेरा देण्यात येणार नाही. गेल्यावर्षीप्रमाणेच हे प्रमाणपत्र देण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page