सावंतवाडी /-

महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून सावंतवाडी नगरपरिषदेच्या विविध प्रकल्पामध्ये झालेल्या कामांची वस्तुस्थिती जाणून घेऊन तपासणी करून चौकशी अहवाल तयार करण्याचे काम चौकशी समिती प्रमुख आणि तहसीलदार तथा विशेष दंडाधिकारी राजाराम म्हात्रे यांच्या समिती सदस्यांच्या वतीने सुरू करण्यात आले आहे.यात नगरपरिषदेच्या उभाबाजार येथील तसेच जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान, शिल्पग्राम आणि हेल्थ पार्क या ठिकाणी भेटी देण्यात आल्या. दरम्यान अर्धवट कामे पुर्ण करण्यासाठी पाच दिवसांची डेडलाईन संबधितांना देण्यात आली असून त्यानंतर पुन्हा या कामाची तपासणी करण्यात येणार आहे, असा निर्णय चौकशी समितीकडुन घेण्यात आला आहे. या चौकशी समितीमध्ये अध्यक्षपदी सावंतवाडी तहसीलदार तथा विशेष दंडाधिकारी राजाराम म्हात्रे तर सदस्य सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावळे, एमटीडीसीचे कनिष्ठ अभियंता सतीश चुडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता अनिल आवटी, पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी संजय कलपे, कंपनीचे प्रतिनिधी मनमित बनारसे यांचा समावेश असून या सर्वांनी आज चार ठिकाणी भेटी देत कामांची पाहणी केली या पथकामध्ये बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीकांत माने यांची नियुक्ती करण्यात आली होती मात्र काल ते या पथकासोबत होते आज त्यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांच्या विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता अनिल आवटी हे होते. या कामात आर्थिक अपहार झाला आहे का? असा प्रश्न समितीला केला असता तुर्तास तरी त्यात कोणताही अपहार झालेला दिसत नाहीत. अर्धवट असलेली कामे पुर्ण करुन घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत, असे सांगुन चौकशी अहवाल सादर करण्यापूर्वी देण्यास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नकार दिला तर पुन्हा एकदा अंतिम तपासणी गुरुवारी 23 सप्टेंबरला केली जाणार आहे त्यानंतर याबाबतचे निष्कर्ष नोंदविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले मुळात सावंतवाडी नगर परिषदेच्या झालेल्या कामात मध्ये 3 कोटी 37 लाख 67 लाख रुपयांचे टेंडर काढण्यात आले होत यापैकी तीन कोटी 32 लाख रुपयांचे ची निविदा मंजूर झाली होती त्यामुळे प्रत्यक्षात चार कोटी पंधरा लाखाचे काम नव्हते असे या समितीने सांगितले तर दोन कोटी 82 लाख रुपयांचे सिविल वर्क म्हणजे बांधकाम झाले असून उर्वरित काम हे इलेक्ट्रिशन विभागाला देण्यात आले आहे दोन कोटी 81 लाख रुपयांचा खर्च आत्तापर्यंत झाला आहे तर मंजूर झालेल्या निविदे पैकी 20 टक्के रक्कम ही राज्य शासनाकडून मिळालेली नाही सावंतवाडी नगर परिषदेच्या जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानातील खेळणी ही केवळ 21 लाखाची आहेत त्यामुळे प्रथमदर्शनी त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे दिसत नाही ही खेळणी प्रत्यक्ष सुरू करून या खेळण्याची उपयोगिता तपासली जाणार आहे 80 टक्के कामे पूर्ण झाल्यामुळे हा प्रकल्प सावंतवाडी नगर परिषदेकडे वर्ग करण्यासाठी पत्र देण्यात आले आहे मात्र हा प्रकल्प अद्यापही नगरपरिषदेने केला नाही दरम्यान खेळणी ऑपरेटिंग साठी नगरपरिषद कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे भविष्यामध्ये या खेळण्यांमध्ये लहान मुलांना किंवा त्यांच्या पालकांना नुकसान होऊ नये अपघात होऊ नये यासाठी हे प्रशिक्षण दिले जाणार आहे या प्रकरणाचा अहवाल पंधरा दिवसात तयार करून सादर करण्यात येणार असून गुरुवारी प्रत्यक्ष ऑपरेटिंग केले जाणार आहे दरम्यान आज या पथकाने हेल्थ पार्क मध्ये जाऊन केलेल्या बांधकामाची पाहणी केली तर शिल्पग्राम या हॉटेलमध्ये जाऊन मुख्य हॉटेल रेस्टॉरंट बांधकामांसह बांधण्यात आलेल्या रूम्स मध्ये दिलेल्या सुविधा आहेत की नाही याची पाहणी केली तर रूम मध्ये रेफ्रिजेटरही असणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले असून याची ही पाहणी पथकाने केली तर स्विमिंग पुलाच्या बाजूला असलेल्य तलावाची ही पाहणी त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page