सिंधुदुर्गनगरी /-

कोरोना कालावधीत काम केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करून शासनाने कोव्हीड योद्ध्यांना धक्का दिला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य कर्मचाऱ्यांनी आज (बुधवारी) जि. प. समोर ठिय्या आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. तर शासकीय सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या कोरोना प्रभाव काळात शासनाकडून कोव्हीड सेंटर उभारण्यात आली. सदर कोव्हीड सेंटर कार्यरत ठेवण्यासाठी सर्व कर्मचा-यांना कोव्हीड योद्धा म्हणून नियुक्ती देण्यात आलेली होती. या कालावधीत कोरोना योध्दा म्हणून कोरोनाची भिती न बाळगता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २७२ कर्मचा-यांनी अविरतपणे काम केले आहे. यामध्ये स्टाफ नर्स, सर्व्हंट, डाटा इंट्री ऑपरेटर, लॅब टेक्नीशियन, फार्माशिस्ट अशा विविध पदांवर सर्वजण कार्यरत होते. परंतु कोरोना काळात काम करुनदेखील कोणतीही पूर्वसुचना न देता ३१ ऑगस्ट, २०२१ पासून शासनाकडून सेवा समाप्त केल्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे अचानक कामावरून कमी केल्याने या कर्मचाऱ्यांना धक्का बसला आहे. त्यांची उपासमार सुरु झाली आहे. कोरोना काळात काम केल्याने कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे, या मागणीसाठी या कर्मचाऱ्यांनी आज जिल्हा परिषद समोर ठीय्या आंदोलन सुरु केले आहे. यामध्ये अमित वजराटकर, प्राजक्ता माळवदे, सुमेंधा गावकर ,रेश्मा नायर, हार्दिक कदम, सुशांंत धुरी, गिरीधर कदम, प्रमोद कलींगण ,लक्ष्मण वरवडेकर आदी कर्मचारी सहभागी झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page