कणकवली /-

कणकवली शहरात गांगोमंदिर समोरील बँक ऑफ इंडियाच्या एटीएम लगतचे दोन दुकानगाळे शुक्रवारी रात्री 11.30 वाजता चोरट्यानी फोडले. दुकानांचे शटर उचकटून चोरट्यानी दुकानात प्रवेश केला. यात एका वैद्यकीय साहित्य व एका कापड दुकान तसेच भालचंद्र मॉल येथील फोटो स्टुडिओचा समावेश आहे. चोरटे दुकानाचे शटर तोडून चोरी करून पळ काढला. याच दरम्यान कणकवलीचे माजी नगरसेवक भूषण परुळेकर हे आपल्या घराकडे जात असतानाच त्यांना हे चोरटे पळताना दिसले. सदर घटनेची माहिती मिळाल्याने यावेळी परुळेकर यांनी तातडीने घटनेची माहिती कणकवली पोलीस स्टेशनला दिली. त्यानंतर काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. अधिक तपास करताच बाजारात उभी केलेली दुचाकींची पेट्रोल टाकी, बॅट्री ही चोरट्यांनी चोरून नेले असून कणकवलीत चोरट्यांनी धुमाकुळ घातला असल्याचे समजत आहे. मात्र या घटनेत चोरीला किती मुद्देमाल गेला की चोरीचा प्रयत्न फसला याबाबत आज (शनिवारी) याची माहिती समजू शकणार आहे. गणेश चतुर्थी दिवशी सर्वजण या उत्सवात सहभागी होत असल्याची संधी साधत चोरटे सक्रिय झाले असून, या काळात अनेकजण आपले फ्लॅट बंद करून गावी जातात. त्यामुळे चोरटे सक्रिय होतात. रात्री ही दोन दुकाने प्रथम दर्शनी निदर्शनास आली. पण अजून कुठे या चोरट्यांनी डल्ला मारला का ते आज स्पष्ट होणार आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून गस्त वाढविण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page