वेंगुर्ला /-


तालुक्यातील निकृष्ट दर्जाचे धान्य वितरण थांबविण्याबाबत आज वेंगुर्ले तालुका शिवसेनेच्या वतीने वेंगुर्ले तहसिलदार प्रविण लोकरे यांना निवेदन देण्यात आले आहे.यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,वेंगुर्ले तालुक्यातील सर्व रेशन दुकानातून वितरण करण्यात येत असलेले तांदूळ,गहू व इतर धान्य हे अतिशय निकृष्ट दर्जाचे असून सदरचे धान्य वितरण त्वरित थांबवून सणासुदीच्या तोंडावर चांगल्या प्रतीचे धान्य मागवून जनतेस वितरित करावे,अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.याबाबत ज्याठिकाणी निकृष्ट धान्य असेल तर ते धान्य तपासण्यात येईल,त्यानुसार वस्तुस्थितीचा अहवाल जिल्हा पुरवठा यांच्याकडे सादर करण्यात येईल व त्यानुसार कारवाई करण्यात येईल,असे तहसिलदार यांनी आश्वासन दिले.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परब,उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी,सुनिल डुबळे,शहरप्रमुख अजित राऊळ,विवेक आरोलकर,योगेश तेली,पंकज शिरसाट,दाभोली सरपंच उदय गोवेकर,संजय परब,डेलिन डिसोजा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page