सावंतवाडी /-
बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष तथा शिक्षणमहर्षी प्रतापराव उर्फ आबासाहेब राघोबा तोरसकर (वय 86) यांचे वृद्धापकाळाने मुंबई-माहीम येथे राहत्या घरी आज सकाळी निधन झाले.

शैक्षणिक क्रांतीत तोरसकर कुटुंबियांचा मोलाचा वाटा आहे. पुण्यश्‍लोक बापूसाहेब महाराज यांच्या शिक्षणविषयक कल्पना आबासाहेब यांनी प्रत्यक्ष अंमलात आणल्या होत्या. नाविन्यपूर्ण शिक्षण प्रणाली अंमलात आणण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या महनीय कार्याबद्दल त्यांना आतापर्यंत शिक्षण महर्षी, शिक्षण भूषण, पर्यावरणमित्र, शरदरत्न, समाजभूषण, कृषीमित्र, भास्कर ॲवॉर्ड आदी मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. शिक्षण मंडळाअंतर्गत मुंबई – परेल, सावंतवाडी तालुक्यातील बांदा, मडुरा, डेगवे, असनिये व दोडामार्ग तालुक्यातील कोलझर, भेडशी, पिकुळे, आयी, कुडासे या शाळांच्या व कनिष्ठ महाविद्यालयांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. इंग्रजी माध्यम ही काळाची गरज ओळखून त्यांनी बांद्यात व भेडशी येथे इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु केली. आबासाहेब तोरसकर यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी श्रीमती कल्पना, मुलगे डॉ. मिलिंद, मुलगी डॉ. मेघना, भाऊ, भावजय, पुतणे, पुतणी असा मोठा परिवार आहे. बांदा ग्रा.पं. सदस्य तथा संस्थेचे स्वीकृत सदस्य मकरंद तोरसकर यांचे ते काका होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page