कणकवली /-

तालुक्यात अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या कलमठ ग्रा. पं. च्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत सर्वसामान्य शिवसैनिकांनी भाजपाच्या बड्या पदाधिकाऱ्यांना पराभवाची धूळ चारली. 17 सदस्य असलेली कलमठ ग्रा.पं. ही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत. भाजपाचे 10 सदस्य असतानाही सध्या भाजपच्या ताब्यात असलेल्या कलमठ ग्रामपंचायतीची सत्ता स्वतःकडे राखण्यात भाजपला अपयश आले आहे. शिवसेनेच्या एक ग्रा. पं. सदस्य अनुपस्थित असतानाही शिवसेना पदाधिकारी रामू विखाळे, जि. प. सदस्या स्वरूपा विखाळे, राजू राठोड, अनुप वारंग, विलास गुडेकर यांनी घेतलेल्या मेहनतीने चमत्कार केला. भाजपाच्या दोन सदस्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला मते दिल्याने समसमान अशी 8 मते प्रत्येकी सेना भाजपाला मिळाली. आणि चिट्ठीद्वारे सेनेच्या धनश्री मेस्त्री यांची कलमठ सरपंचपदी निवड झाली. आता भाजपाची कोणत्या सदस्यांनी सेनेला मतदान केले ? हे शोधतानाच अंतर्गत दुही मिटवण्याचे आव्हान ही भाजपासमोर असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page