कुडाळ /-

बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग महाविद्यालय कुडाळच्या विद्यार्थिनींनी बांधल्या डॉक्टर्सना राख्या कोरोना महामारी च्या काळात आपली दैनंदिन सुखदुःख बाजूला ठेवून अविरतपणे वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टर्स चे योगदान लक्षात घेऊन बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी व प्राध्यापकांनी सद् भावनेतून बांधल्या कुडाळ येथील डॉक्टर्सना राख्या. .. .. जगावर ओढवलेल्या कोरोनाच्या संकटातून जगाला बाहेर काढण्यासाठी वैद्यकीय सेवा देणाऱ्या सर्व डॉक्टर्स , नर्सेस व आरोग्य कर्मचाऱ्यांच फार मोठे योगदान आहे.त्यांनी धीरोदात्तपणे रुग्णांची सेवा केली, कोरोना बाधितांना वैद्यकीय सेवा पुरविल्या.त्या सेवा,लस देण्यासाठी अहोरात्र प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे कोरोना हा रोग आटोक्यात येऊ लागलेला आहे. समाजाला या दुःखाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी प्रसंगी आपलं आयुष्य धोक्यात घालून, कौटुंबिक गरजांच्या गुंतावळ्यात न अडकता कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जे योगदान दिलं त्याची यथार्थ जाणीव ठेवून बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे कोविड योद्धा चेअरमनन उमेश गाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ येथील विविध रुग्णालयात जाऊन नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक व विद्यार्थिनी सगळ्यांना शुभेच्छा देत समाजसेवेच्या या व्रताची सदैव आठवण ठेवत त्यांना राख्या बांधल्या. आम्ही तुमच्या सोबत आहोत असाच संदेश या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमातून त्यांनी दिलेला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे विविध स्तरातून कौतुक होत आहे. .. . यावेळी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सौ.कल्पना भंडारी, प्रा प्रियांका माळकर ,प्रथमेश हरमलकर ,प्रसाद कानडे , संस्था जनसंपर्क अधिकारी पियुषा प्रभूतेंडोलकर तसेच विद्यार्थ्यीनीमधून दीक्षा तळकर, सायली कुलकर्णी ,चैतन्या शेळके अशा विद्यार्थिनींनी व प्राध्यापकांनी यात भाग घेतला कुडाळ येथील डॉक्टर चुबे ,डॉक्टर श्रीपाद पाटील, डॉ. विशाखा पाटील, डॉक्टर वालावलकर, व डॉक्टर संजय निगुडकर यांच्या रुग्णालयात जाऊन हे रक्षाबंधन पार पाडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page