वरोरा /-

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही देशातील नव्हे तर जगातील सर्वांत मोठी विद्यार्थी संघटना म्हणून ओळखली जाते. विविध आंदोलन, शिबीर, व सामाजिक उपक्रम अभाविप नेहमी करत असते. त्यांचा एक भाग म्हणजे सामाजिक बांधिलकी म्हणून अभाविपच्या माध्यमातून गेल्या सात ते आठ वर्षांपासून रक्षाबंधन कार्यक्रम घेतला जातो. बहीण – भावाचं नातं जोपासणारा सण साजरा करत असतो. तो सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधनाच्या माध्यमातून अभाविपच्या कार्यकर्त्या अहोरात्र देशासाठी काम करणाऱ्या पोलिस बांधवांना पोलीस कर्मचाऱ्यांना व नेहमी वर्षभर प्रवाशांना नेहमी सेवा देणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कामगार बांधवांना,बस चालकांना व कंडक्टर यांना राख्या बांधण्याचा कार्यक्रम दरवर्षी घेत असते. या वर्षी सुद्धा अभाविपच्या माध्यमातून पोलीस स्टेशन वरोरा व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वरोरा आगारात अश्या दोन ठिकाणी रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला व सर्वं पोलीस बांधवांना कर्मचाऱ्यांना, तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वरोरा आगाराच्या सर्वं अधिकारी,कर्मचाऱ्यांना, बस चालकांना , कंडक्टर ला ओवाळून राख्या बांधण्यात आल्या व सर्वांना मिठाईचे वाटप करून रक्षाबंधनच्या शुभेच्छा देण्यात आल्या अश्या प्रकारे आपुलकीची भावना व्यक्त करत अभाविप च्या विद्यार्थिनी कार्यकर्त्यांनी रक्षाबंधन सण उत्साहात साजरा केला. या वेळी पोलीस बांधवा सोबत काही विषयावर चर्चा करण्यात आली. कोरोना चे सर्व नियम पार पाडत. मास्कचा, आणि सॅनिटायझर वापर करून हे कार्यक्रम यशस्वी पणे व उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी अभाविप जिल्हा समिती सदस्य शकिल शेख, गणेश नक्षिणे, नगरमंत्री छकुली पोटे, नगरसह मंत्री नाझीया पठाण, विद्यार्थिनी प्रमुख तृप्ती गिरसावळे, कोष प्रमुख सानिया पठाण, निधी राखुंडे, पूजा येरगुडे, छकुली गेडाम, मयुरी येटे, सौरभ साखरकर, लोकेश घाटे, अंकित मोगरे, रवी शर्मा, अथर्व कष्टी, आदी अभाविप कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page