परुळे येथील आजच्या सभेत जमीनमालक व ग्रामस्थ आक्रमक..

परुळे /-
आदिनारायन मंदिर ते परुळे बाजारपेठ ते चिपी विमानतळ रस्ता रुंदीकरण संदर्भात जमीन संपादन संदर्भात आयोजित केलेल्या सभेत या रुंदीकरणाला ग्रामस्थांनी प्रखर विरोध दर्शविला. घरे, दुकाने व बाजारपेठ उध्वस्त करून आम्हाला रुंदीकरण नकोच असा पवित्रा जमीनमालक व ग्रामस्थांनी घेतला. ही सभा सार्वजनिक बांधकाम विभाग वेंगुर्ला यांनी लावली होती.
यावेळी कार्यकारी अभियंता श्री आवटी, सरपंच श्वेता चव्हाण, उपसरपंच मनीषा नेवाळकर, ग्रामसेवक शरद शिंदे, सदस्य सुनील चव्हाण, शांताराम पेडणेकर, सव्हेअर पाटकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रसाद पाटकर उपस्थित होते. तर यावेळी भूमिपुत्र डॉ. उमाकांत सामंत, कस्टम विभाग सेवा निवृत्त अधिकारी रमाकांत आजगावकर, सचिन देसाई भाऊ परूळेकर, सचिन सामंत, सुधीर पेडणेकर, अरविंद तेली, यांनी उपस्थित अधिकारी वर्गाला मुद्दे सुद्ध माहिती दिली. यावेळी ग्रामस्थ ही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी आदिनारायन मंदिर ते परुळेबाजाररस्ता रुंदीकरण केला तर परुळे गावाची बाजारपेठ उध्वस्त होणार आहे. त्यामुळे हे रुंदीकरण करू नये. यापूर्वी सन 1980 मध्ये केलेल्या सर्व्हे प्रमाणे रस्ता न्यावा तसेच बाजारपेठ ते विमानतळ हा रस्ता रुंदीकरणाला ही ग्रामस्थांनी विरोध दर्शविला. यापूर्वी विमानतळ साठी जमीन घेताना ही शासनाने ग्रामस्थांची कवडी मोल दर देऊन फसवणूक केली आहे. आता रास्ता रुंदीकरण च्या नावाखाली आम्हाला बेघर व्हायचे नाहीं, तरी हा प्रस्ताव आम्हाला मान्य नाही असा एकमुखी निर्णय ग्रामस्थनी घेतला व तसा ठराव अधिकारी यांचेकडे दिला आहे. यावेळी डॉ उमाकांत सामंत, रमाकांत आजगावकर, अजित परुळेकर, अभय परुळेकर, सचिन सामंत, डॉ उमाकांत सामंत सचिन देसाई रमाकांत आजगावकर अजित परुळेकर अभय परुळेकर सचिन सामंत व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page