सावंतवाडी /-
वेत्ये येथील रहिवासी श्रीमती सुप्रिया पांडूरंग गावकर (वय 65) यांचे राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, विवाहीत मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे. व्यावसायिक तथा सामाजिक कार्यकर्ते पांडूरंग गावकर यांच्या पत्नी तर सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र गावकर यांच्या त्या मातोश्री होत.