वेंगुर्ला /-


मानव साधन विकास संस्था संचलित परिवर्तन केंद्र संकल्पनेअंतर्गत जन शिक्षण संस्थान सिंधुदुर्ग तर्फे माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे प्रयत्नातून गोवा विमानतळ प्राधिकरण यांचे सीएसआर निधीतून सायकल बँक अंतर्गत सायकल वाटप वितरण समारंभ स. का .पाटील विद्यामंदिर केळूस या प्रशालेमध्ये पार पडला.या कार्यक्रमात शाळेतील १० मुलींना सायकल वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास प्रदेश कार्यकारणी सदस्य शरदजी चव्हाण,परिवर्तन केंद्र समन्वयक विलास हडकर, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई,तालुका अध्यक्ष सुहास गवंडळकर,तालुका सरचिटणीस प्रशांत खानोलकर
तसेच सामाजिक कार्यकर्ते राजू पावसकर ,संदीप तांडेल, सुजित केळुसकर,शिवलकर, वराडकर ,केळुस हायस्कूल चे मुख्याध्यापक प्रकाश खोत व सर्व शिक्षक, पालक उपस्थित होते.यावेळी कु. आचल आनंद केळुसकर या विद्यार्थिनीला माजी सभापती घनश्याम उर्फ नीलेश सामंत यांच्यामार्फत ५ हजार रुपये शैक्षणिक मदत देण्यात आली. तसेच केळुस हायस्कूल चा दहावीचा निकाल शंभर टक्के लागल्याबद्दल भाजपच्या वतीने मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला.मुख्याध्यापक खोत यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page