वेंगुर्ला /-


आजच्या या युगात ज्ञानाचा प्रस्फोट वाढत असताना शिक्षणात आमूलाग्र बदल होत आहेत आणि यासाठी आपण सर्व शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या मजबूत पायाभरणी साठी अविरत धडपडत आहात.वेगळी वाट,वेगळा ध्यास,वेगळा विश्वास यातूनच शाळेच्या भवितव्याचा विकास हाच तुम्हां सर्व शिक्षकांचा श्वास असल्याने आज शिक्षण प्रसारक समिती वेतोरे या संस्थेच्या वतीने तुम्हां सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी वृंदाचा गुणगौरव होत आहे,असे प्रतिपादन संस्थेचे कार्याध्यक्ष दिगंबर नाईक यांनी या गुणगौरव समारंभाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना व्यक्त केले.शिक्षण प्रसारक समिती वेतोरेच्या वतीने श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरे आणि कृ.का.चमणकर हायस्कूल आडेली या दोन्ही प्रशालेतील एकूण ३४ शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि १० वी मधून प्रथम आलेली कु.पूर्वा तिरोडकर आणि १२ वी वाणिज्य शाखेतुन वेंगुर्ले तालुक्यात प्रथम आलेली कु.मनाली कुबल या दोन्ही विद्यार्थ्यांच्या पालकांचा सत्कार स्वामी समर्थ सभागृह वेतोरे या ठिकाणी संपन्न झाला.यावेळी व्यासपीठावर संस्था कार्याध्यक्ष दिगंबर नाईक,कार्यवाह प्रभाकर नाईक,उपाध्यक्ष नंदकिशोर पुनाळेकर,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सूर्याजी नाईक चंद्रकांत गडेकर,सुरेश धुरी,शिवराम गोगटे,मुरारी सामंत,आडेली हायस्कूल मुख्याध्यापक चव्हाण,मेघना सामंत आणि वेतोरे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका स्वाती वालावलकर आदी उपस्थित होते.दोन्ही शाळांतील शिक्षकांनी प्रचंड मेहनत घेऊन प्रशालेची गुणवत्ता कायम राखली. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा)औरंगाबाद मार्फत यशोगाथा केस स्टडी साठी फ्लिपबुक मध्ये वेतोरे हायस्कूल ची निवड झाल्याने संस्था कार्याध्यक्ष दिगंबर नाईक यांच्या कल्पकतेतून सर्व शिक्षिकांचा साडी देऊन तर सर्व शिक्षक – शिक्षकेतर वृंदाना भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.पुढील वर्षी याहीपेक्षा उत्तुंग कामगिरी,कार्य करण्याची प्रेरणा,उर्जा व सकारात्मक विचार करण्याची कृती आपणां सर्वांकडून घडावी असा आशावाद कार्याध्यक्ष दिगंबर नाईक यांनी व्यक्त केला.याप्रसंगी प्रभाकर नाईक,नंदकिशोर पुनाळेकर ,मेघना सामंत ,देवानंद चव्हाण, संजय परब,नीता मराठे,उदय आडेलकर, पूर्वा तिरोडकर, मनाली कुबल यांनी आपले विचार व्यक्त केले.यावेळी श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरे प्रशालेच्या वतीने
दिगंबर नाईक यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्तविक व उपस्थित मान्यवरांचे स्वागत वेतोरे हायस्कूल मुख्याध्यापिका स्वाती वालावलकर यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार निलेश पेडणेकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page