सिंधुदुर्ग /-

बार कौन्सिलच्या नाम फलकावर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव कोरण्यात बार कौन्सिलच्या सर्व वकिलांचा मोठा वाटा आहे. आपल्या समस्या बरोबर कोल्हापूर खंडपीठ होण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रयत्न केले जातील. तसेच सिंधुदुर्ग चे नाव  बार कौन्सिल नकाशावर अधोरेखित करण्यासाठी प्रयत्नशील राहीन असे सूचक  उद्गगार नूतन बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा चे उपाध्यक्ष ऍड.. संग्राम देसाई यांनी काढले.

सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा न्यायालय बार कौन्सिल वकील कक्षामध्ये नूतन बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा उपाध्यक्षपदी अड. संग्राम देसाई यांची निवड झाली याबद्दल सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता, यावेळी जिल्हा बार कौन्सिलचे अध्यक्ष राजेंद्र रावराणे, उपाध्यक्ष गिरीश गिरकर, सचिव अमोल मालवणकर, सहसचिव यतीन खानोलकर, खजिनदार प्रकाश  बोडस, उमेश सावंत, दीपक नेवगी, विलास परब, अमोल सामंत, अविनाश पराब, राघवेंद्र नार्वेकर, गौरव पडते, सुमन गावडे, अश्फाक शेख, सूर्यकांत प्रभू, यतीन खानोलकर, राजेश परूळेकर, पंकज आपटे, अमोल साळगावकर, आनंद गावडे, शार्दुल पिंगुळकर, प्रणिता कोटकर, आदीं सह जिल्ह्यातील वकील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास परब यांनी केले. यावेळी उपस्थित वकिलांच्या वतीने एड.संग्राम देसाई यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राजेंद्र सावंत,माधवी बांदेकर, प्रकाश गोडकर ,सूर्यकांत, राजश्री नाईक, शेखर सामंत आदींची समय सुचक भाषणे झाली. वकिली क्षेत्राबरोबर सामाजिक  सांस्कृतिक व अन्य क्षेत्रातही संग्राम देसाई यांचे वाखाणण्याजोगे काम असून बार असोसिएशनच्या कार्या मध्ये गेली अनेक वर्षे झोकून काम केल्याचे हे यश असून महाराष्ट्र गोवा बार असोशियन मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उपाध्यक्ष पदावरून कोरले आहे. लवकरच बार असोसिएशनचे अध्यक्ष पदी विराजमान होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले जावे अशी आशावाद वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

यावेळी बार असोसिएशनचे दिवंगत वकिलांना श्रद्धांजली वाहण्यात आली. असोसिएशनचे  जिल्हाध्यक्ष राजेंद्र रावराणे यानी बार कौन्सिल सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याचे नाव अधोरेखित करण्यासाठी अनेक वकिलांचे  योगदान आहे. या बार कौन्सिल मध्ये १ लाख ७५ हजार वकिलांचे नेतृत्व आज संग्राम देसाई करत आहेत. संग्राम देसाईंच्या नावाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव अधोरेखित होत आहे. यावेळी यापूर्वीच्या बार असोसिएशनचा इतिहास उभा करत संघटना कशा पद्धतीने उभी केली याचा पाढा रावराणे यांनी वाचला. तर लवकरच कुडाळ येथे संग्राम देसाई यांचा नागरी सत्कार करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला जाईल असे सांगितले. सत्कारमूर्ती संग्राम देसाई म्हणाले आजचा हा आपला कौटुंबिक कार्यक्रम आयोजित केला हा आपणा सर्वांचा मोठेपणा आहे. मी काय मोठं केलं समजत नाही कोणत्याही पदावर जावो सामान्य सारखं राहिलं पाहिजे. नांदोस हत्याकांड सारख्या अनेक न्याय-निवाडा मध्ये आपण काम केले अशी कामे करताना वकिलांचा मध्ये कटुता येते. परंतु कटूता येऊनही आपण एकत्र येऊन सन्मान करता यातच सर्व काही आहे मला बार कौन्सिलच्या  उपाध्यक्ष पदावर नेऊन सिंधुदुर्ग- रत्नागिरी जिल्ह्याचे नाव उज्वल केले यात सामान्यांचा ही सहभाग आहे. आतापर्यंत कधी बार कौन्सिल मध्ये सिंधुदुर्गचे नाव कोरले नाही ते माझ्या रूपाने कोरले गेले आहे. मला निवडून आणण्यामध्ये आपण सर्वांनी सहकार्य केले त्याबद्दल आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. अशी मला तरुण वकिलांसह सर्वांची टीम मिळाली आहे. कोल्हापूर खंडपीठ करण्यासाठी लवकरच केंद्रीय गृहमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा करून ते होण्यासाठी प्रयत्न करू तसेच हायकोर्ट, उच्च न्यायालयात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page