सिंधुदुर्ग /-

रस्ता सुरक्षा समितीचे अशासकीय सदस्य नागेश ओरसकर यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर त्याची दखल घेत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कॅम्पचे आयोजन करत गेल्या दोन दिवसात सुमारे १५५ लर्निंग लायसन धारकांची पक्या लायसन साठी टेस्ट घेतली.

गेले दीड वर्षापासून सुमारे साडेचार हजार लर्निग लायसन धारक पक्के लायसन मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच आर टी ओ कार्यालयाकडून पक्के लायसन देण्यासाठी कॅम्प आयोजित केले जात नसल्याने संबंधितांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार असल्याबाबत नागेश ओरोसकर यांनी निवेदन देत लक्ष वेधले होते. तर पक्के लायसन देण्यासाठी आर टी ओ विभागाकडून येत्या आठवड्यात कॅम्प आयोजित न केल्यास आर टी ओ कार्यालयासमोर आपण बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना दिला होता.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले दीड वर्षापासून कोरोणाचे सावट आहे. मात्र शासकीय कार्यालयांचे कामकाज सुरू आहे. आमदार, खासदार, पालकमंत्री यांचे दौरे आणि बैठका होत आहेत. मात्र असे असले तरी सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे कामकाज मात्र संथ गतीने सुरू आहे. कोरोना सुरू झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यातील साडेचार हजार नागरिकांनी लर्निग लायसन घेतले आहे. मात्र लर्निग चे पक्के लायसन करण्यासाठी आर टी ओ कार्यालयाने अद्याप कॅम्प आयोजित केलेले नाहीत. त्यामुळे यातील काहींच्या लर्निग लायसन ची मुदत संपलेली आहे तर काहींची संपत आली आहे. त्यामुळे त्वरित कॅम्प आयोजित केले नाहीत तर संबंधितांना पुन्हा लर्निग लायसन साठी अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी नाहक भुर्दंड त्यांना सोसावा लागणारा आहे. शिवाय वाहतूक पोलीस यांच्याकडून लर्निग लायसन ची मुदत संपल्याने नाहक त्रास सोसावा लागत आहे. त्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी तात्काळ पक्के लायसन देण्यासाठी कॅम्प आयोजित करावेत. अशी मागणी केली होती.तसेच येत्या आठ दिवसांत कॅम्प आयोजित केले नाहीत तर आर टी ओ कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा इशारा रस्ता सुरक्षा समितीचे अशासकीय सदस्य नागेश आरोसकर यांनी चार दिवसापूर्वी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र सावंत यांना निवेदनाद्वारे दिला होता. याची दखल घेत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस कॅम्प आयोजित करून सुमारे १५५ जणांची पक्क्या लायसन साठी टेस्ट घेतली आहे. पहिल्या दिवशी ७० जणांची तर आज शनिवारी ८५ लर्निंग लायसन धारकांची पक्क्या लायसन्स साठी टेस्ट घेण्यात आली. उर्वरित लर्निंग लायसन धारकांना पक्के लायसन देण्यासाठी टप्प्याटप्प्याने कॅम्पचे आयोजन करण्यात येईल. असे मोटर वाहन निरीक्षक मारुती दगडू चौगुले यांनी यावेळी स्पस्ट केले.

माझा लढा सुरूच राहील

माझ्या निवेदनानंतर आरटीओ कार्यालयाने गेले दोन दिवस कॅम्पचे आयोजन करून लायसन साठी टेस्ट सुरू केली आहे. मात्र केवळ दिखाऊपणा साठी कार्यवाही होत असेल तर गप्प बसणार नाही. जोपर्यंत प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील सुमारे चार हजार लर्निंग लायसन धारकांना पक्के लायसन्स दिले जात नाही तोपर्यंत माझा लढा सुरूच राहील. असे यावेळी आरटीओ रस्ता सुरक्षा अशासकीय सदस्य नागेश ओरसकर यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page