मागील पंधरा वर्षात तारेवरची कसरत करत केले काम…

दोडामार्ग /-

आरोग्य विभागात सन २००५ साली सुरू झालेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ५५६ तर राज्यात २५००० अधिकारी व कर्मचारी विविध पदावर गाव तालुका जिल्हा ते राज्य स्तरावर मागील पंधरा वर्षांपासून एन एच एम अंतर्गत कंत्राटी तत्त्वावर कार्यरत आहेत ज्यांनी कोरोना सारख्या आजाराचा प्रादुर्भाव सुरू असताना ही जीवाची पर्वा न करता सर्व अधिकारी कर्मचारी जीवाची बाजी लावत काम करताना दिसत असून त्यातच आरोग्य मंत्री मा.राजेश टोपे यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाकडील २७२५ पदांकरिता ०६/०८/२०२१रोजी जाहिरात प्रसिद्ध देखील केली असता पंधरा वर्षापासून कार्यरत अनुभवी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात आलेले नाही, तसेच भविष्यात होऊ घातलेल्या आरोग्य व ग्रामविकास कडील सुमारे १२००० रिक्त पदे पद भरती करण्यात येईल असे सांगितले असून मान्यता देखील घेतली आहे असे समजत असून दिनांक ०८ मे २०१८ रोजी गठीत केलेल्या त्रिसदस्यीय मंत्रिस्तरीय समितीने दिलेल्या निर्णयानुसार या अभियानातील अनुभव व कौशल्याच्या आधारे आरोग्य व ग्रामविकास कडील सरळ सेवा भरती प्रक्रियेत वयाची अट शिथिल करून ४० टक्के आरक्षण देण्याबाबत निर्णय झालेला असून तसा प्रस्ताव सामान्य प्रशासनास सादर देखील केला आहे ,या अभियानातील सर्व कर्मचारी अनुभवी प्रशिक्षित व सक्षम पदांस गुणवत्ताधारक असल्याने आरोग्य व ग्रामविकास कडील नियमित भरतीमध्ये प्राधान्याने यांचा विचार करून सर्व अधिकारी कर्मचारी यांना न्याय मिळवून देण्यात यावा यासाठी येत्या १५ ऑगस्ट रोजी अभियानातील शंभर अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थित न्याय मार्गाने मा.पालकमंत्री,मा. खासदार मा.आमदार, मा. जिल्हाधिकारी यांची जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे भेट घवुन राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघ त्यांच्या मागण्या व्यथा व भावना मांडून चालू भरती प्रक्रियेत प्राधान्य मिळण्याबाबत तसेच ०८/०५/२०१८ च्या गतीत मंत्रिस्तरीय समितीच्या शिफारशीनुसार सकारात्मक निर्णय मिळण्याकरिता विनंती करणार असल्याचे राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघ यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page