‘क्रांतीदिन ते स्वातंत्र्यदिन’ उपक्रमाअंतर्गत कोलगाव केंद्राच्यावतीने आयोजन
 

सावंतवाडी /-

‘क्रांतीदिन ते स्वातंत्र्यदिन’ या उपक्रमाअंतर्गत कोलगाव केंद्राच्यावतीने केंद्रस्तरावर घेण्यात आलेल्या जयहिंद देशभक्ती गीत गायन स्पर्धेत आंबेगाव शाळेने प्रथम क्रमांक पटकाविला. कोविडच्या काळातही ग्रामीण भागातील मुलांना, शैक्षणिक गुणवत्ता स्तरावर ठेवण्यासाठी कोलगाव केंद्राच्यावतीने विविध शैक्षणिक उपक्रमांचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून क्रांतीदिन ते स्वातंत्र्यदिन” या उपक्रमाअंतर्गत केंद्रस्तरावर जयहिंद देशभक्ती गीत गायन स्पर्धेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत लहान गटात एकूण दहा शाळांनी तर मोठ्या गटात चार शाळा सहभागी झाल्या होत्या. यात लहान गटात प्रथम- आंबेगांव शाळा नं. १, द्वितीय- कुणकेरी शाळा नं. २, तृतीय- कुणकेरी शाळा नं. १, उत्तेजनार्थ- आंबेगाव म्हारकाटे व कुणकेरी शाळा नं. ३ मोठ्या गटात प्रथम- आंबेगाव शाळा नं. १, द्वितीय- कुणकेरी शाळा नं. १, तृतीय- कोलगाव नं. २, उत्तेजनार्थ- कोलगाव नं. १ या शाळांनी यश मिळवले आहे. सहभागी सर्व शाळांचे, मुलांचे व शिक्षकांचे केंद्रप्रमुख म. ल. देसाई यांनी अभिनंदन केले. या स्पर्धेचे परिक्षण कोलगाव हायस्कूलचे संगीत व कला शिक्षक संगीत तज्ञ आर. सी. मेस्त्री यांनी केले तर स्पर्धा प्रमुख म्हणून कुणकेरी नं. २ चे मुख्याध्यापक नागेश गावडे यांनी काम पाहिले आहे. शैक्षणिक उपक्रमांच्या संयोजनामध्ये केंद्रमुख्याध्यापक रेखा पवार, विठ्ठल कदम, मिंगेल मान्येकर, अस्मिता मुननकर, पल्लवी लुथडे, प्रशांत कदम, प्रवीण कुडतरकर, तुकाराम राणे, अनिल मुळीक आदी शिक्षकांनी सहभाग घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page