परिस्थितीला आव्हान द्यायचे आणि परिस्थितीवर मात करायची ही राणे साहेबांची शिकवण आमदार राणे यांनी १६९ सरपंचांना दिलेल्या विमा पॉलिसीचे झाले वितरण..

कणकवली /-


परिस्थितीला आव्हान द्यायचे आणि परिस्थितीवर मात करायची ही केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांची शिकवण आमदार नितेश राणे यांनीं स्वीकारली आहे. कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या सारपंचांसाठी मायबाब राज्य सरकार काहीच करत नसेल तर त्यांच्या पाठीशी आमदार नितेश राणे आहेत असा चांगला संदेश आज राज्यात गेला आहे.आमदार नितेश राणे यांच्या या कामाचे अनुकरण राज्यातील इतर मतदारसंघात होईल आणि त्याचा फायदा सर्वच सरपंचांना मिळेल असा विश्वास राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
भाजपा आमदार नितेश राणे यांनी कणकवली, देवगड, वैभववाडी या आपल्या मतदारसंघातील १६९ सरपंचांना आरोग्य विमा स्वखर्चाने काडून दिला. त्या विमा पॉलिसीचे वितरण विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले.या कार्यक्रमात श्री.फडणवीस हे ऑनलाईन सहभागी झाले होते.कणकवली प्रहार भवन येथे हा कार्यक्रम झाला यावेळी ते बोलत होते.
श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात कार्य कर्तृत्वाने स्वतःची छाप उमठवलेले आमदार म्हणजेच नितेश राणे होय. सरपंचना राज्य सरकाने कोरणा काळात संरक्षण द्यावे त्यांच्या जीवितासाठी विमा संरक्षण द्यावे यासाठी आमदार नीतेश राणे सातत्याने प्रयत्न केलेत.मात्र राज्य सरकारने शब्द पाळला नाही.कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या सरपंचाना वाऱ्यावर सोडले. आज कोरोना नियंत्रणात आला तो गावो गावच्या सरपंचांमुळेच. यश सरपंचांनी मिळून केलेल्या कामाचे आहे.त्याचा विचार करून आमदार नितेश राणे सारपंचांच्या विमा संरक्षणाची जबाबदारी घेतली हे फार मोठे कार्य आहे.
कोरोना काळात कोकणात भ्यावस्थिती होती या काळात विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे साहेबांचे मेडिकल कॉलेज आणि व्हास्पिटल नसते तर भीषण स्थितीला सामोरे जावे लागले असते. कोरोना टेस्ट पासून उपचारपर्यत आवश्यक त्या सर्व सेवा येथे उपलब्ध झाल्या.जेव्हा आवश्यकता होती तेव्हा आरोग्य स्टाफ रत्नागिरी जिल्हात सुद्धा राणेंच्या पडवे व्हास्पिटल मधून दिला गेला हे रत्नागिरी दौऱ्यात कळले तेव्हा समाधान वाटले.अशा शब्दात रुग्णालयाने जनतेचे कसे प्राण वाचतात हे श्री. फडणवीस यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनसेवा करण्यासाठी आणि नड्डा यांनी सेवा हेच संघटन हा नारा दिला, तेव्हा खरतर भाजपाचा कार्यकर्ता थांबला नाही.कोरोनाने अनेक कार्यकर्ते मृत्युमुखी पडले मात्र सेवा कार्य थांबले नाही आणि आजही ते सेवेचे काम चालूच आहे. कोकणावर तीन संकटे आली त्यात निर्सग वादळ, तौक्ते चक्रीवादळ,महापूर अशा या संकटात भाजपा कार्यकर्ते कायम सेवा देत राहिले.हेच सेवेचे व्रत घेऊन आमदार नितेश राणे यांनी सरकार करत नसेल तर ते आम्ही करू असा निश्चय करून सरपंचाना सुरक्षा कवच दिले.एक आदर्श समाजासमोर घालून दिला.
कोरोना लस हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. देशातकोरणा लस देणात महाराष्ट्र अववल आहे अशा जाहिराती राज्य सरकार देते आणि दुसरी कडे केंद्र सरकार लस देत नाही म्हणून ओरडत आहे.केंद्राने लस दिली नाही तर तुम्ही अववल कसे झालात ? लस जमिनीतून उगवल्या काय ? अशा शब्दात राज्य सरकारवर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली.राज्यात कोरोनाचे संकट आहे मात्र त्यावर आम.नितेश राणे सारखे लोकप्रतिनिधी आमचे सहकारी असताना या कोरोना संकटातून सुखरूप बाहेर पडू असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page