सिंधुदुर्ग /-

भारतीय जनता पक्षाच्या “जन आशीर्वाद यात्रे” बद्दल लोकांमध्ये प्रचंड औत्सुक्याचे वातावरण आहे. आपण प्रधानमंत्री नव्हे तर प्रधान सेवक आहोत आणि या देशाचा कारभार लोकाभिमुख असावा ही मा.नरेंद्र मोदी यांची नेहमीच भूमिका राहिली आहे. याच संकल्पनेतून देशभरातील जनतेचा आशीर्वाद घ्या म्हणून आपल्या मंत्र्यांना सांगणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत.

याच पार्श्वभूमीवर कोकणचे नेतृत्व ना. नारायणराव राणे यांची जन आशीर्वाद यात्रा दिनांक १९ ते २६ ऑगस्ट या काळात मुंबईपासून ते सिंधुदुर्गपर्यंत निघत आहे. या झुंजार आणि अभ्यासू नेतृत्वाला मिळालेले केंद्रीय मंत्रीपद, रोजगाराच्या क्षेत्रात कोकणच्या बेरोजगारांना उभे करू शकण्याची क्षमता असणारे मध्यम, लघु व सुक्ष्म उद्योग मंत्रालय आणि कोकणातील सध्याची राजकीय स्थिती पाहता ही यात्रा प्रचंड जोशात आणि उत्साहात होणार हे निश्चित. या यात्रेच्या नियोजनाचे प्रमुख ही जबाबदारी पक्षाने महाराष्ट्र प्रदेश सचिव मा.प्रमोदजी जठार यांच्यावर सोपवली आहे. कोकणातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व नेते यांच्यासह प्रमोद जठार यांनी जोरदार आढावा बैठका आयोजीत केल्या आहेत. यात्रेचे परिपूर्ण नियोजन करण्यासाठीच्या या आढावा बैठकांची आज दिनांक १२ ऑगस्ट पासून सुरुवात होत आहे.

या बैठकांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून दिनांक १२ ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता माणगाव रायगड येथून सुरुवात होणार आहे. दक्षिण रायगडचे जिल्हाध्यक्ष महेशजी मोहिते, आमदार नितेशजी राणे आणि मा. निलेशजी राणे यांच्यासह नियोजनाची ही बैठक होणार आहे. त्याच दिवशी संध्याकाळी चार वाजता चिपळूण येथे उत्तर रत्नागिरी विभागाची आढावा बैठक मा. प्रमोदजी जठार यांच्यासह जिल्हाध्यक्ष मा. विनयजी नातू, आमदार नितेशजी राणे व प्रदेश सचिव निलेशजी राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

१३ ऑगस्ट रोजी रत्नागिरी येथे आढावा बैठक जिल्हाध्यक्ष मा. दीपकजी पटवर्धन यांच्यासह होत आहे. मा.प्रमोदजी जठार, निलेशजी राणे व आमदार नितेशजी राणे या बैठकीत संगमेश्वर ते राजापूर या क्षेत्रातील यात्रेचा नियोजनात्मक आढावा घेणार आहेत.

दिनांक १४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्याची आढावा बैठक प्रहार भवन, कणकवली येथे होणार आहे. यात्रेचे प्रमुख प्रमोदजी जठार, आमदार नितेशजी राणे, जिल्हाध्यक्ष तेली, प्रदेश सदस्य अतुलजी काळसेकर, माजी आमदार अजितराव गोगटे यांच्यासमवेत यात्रेच्या नियोजनाची चर्चा या बैठकीत होईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या दौऱ्याचा समारोप होत असून ना. राणे यांचे स्वागत शानदार व यादगार होईल असे नियोजन करण्यात येईल.

१६ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता वसंत स्मृती दादर येथे मुंबईची आढावा बैठक होत आहे. आ.सुनील राणे हे नारायणराव राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचे सहप्रमुख असून मुंबईतील यात्रेच्या नियोजनाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. मुंबईतल्या या आढावा बैठकीला कार्यक्रम प्रमुख मा. प्रमोदजी जठार यांच्यासह प्रदेश सचिव निलेशजी राणे, आमदार नितेशजी राणे, आमदार सुनीलजी राणे हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. जन आशीर्वाद यात्रा १९ व २० ऑगस्ट रोजी मुंबई तसेच २१ ऑगस्ट रोजी वसई विरार येथे असणार आहे. वसई विरार येथील कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा दिनांक १७ ऑगस्ट रोजीच्या बैठकीत घेतला जाईल. या बैठकीसाठी मा.प्रमोदजी जठार, मा. निलेशजी राणे, आमदार नितेश राणे, आमदार सुनील राणे, जिल्हाध्यक्ष श्री राजन नाईक यांच्या उपस्थितीत आढावा घेतला जाणार आहे.

एकूणच कोकणच्या राजकीय पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नाम. नारायणराव राणे यांचा दौरा हा झंजावाती ठरणार आहे. या दौऱ्यात खऱ्या अर्थाने जन आशीर्वाद प्राप्त करण्याच्या दृष्टीने नियोजन व्हावे यासाठी या कार्यक्रमाचे प्रमुख मा. प्रमोदजी जठार यांच्या आढावा बैठकांची सुरुवात उद्या माणगावपासून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page