सावंतवाडी /-

सुंदरवाडी म्हणजे सावंतवाडी शहराची निर्मिती करणारे सावंतवाडी संस्थानचे राजे दुसरे खेम सावंत यांचे पुतळारूपी स्मारक सावंतवाडीत व्हावे अशी मागणी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक वसंत उर्फ अण्णा केसरकर, प्रा. जी. ए. बुवा, सामाजिक कार्यकर्ते सुनील सावंत यांनी सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

हे निवेदन नगरसेवक मनोज नाईक यांच्या उपस्थितीत नगरपरिषद मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. सावंतवाडी ही चराठा गावची सुंदरवाडी आहे. नरेंद्र डोंगराच्या हिरव्यागार वनराईने नटलेल्या सावंतवाडी शहरामध्ये सुंदरवाडी दुसऱ्या खेम सावंत यांनी वसविली आहे असा उल्लेख 1991-92 मधील कागदपत्रात आढळतो. सुंदरवाडी सावंतवाडी म्हणून अधोरेखित केल्याचे जाणवते असे या निवेदनात म्हटले आहे.

खेम सावंत यांनी वसवलेली प्रशासकीय राजधानी हळूहळू सावंतवाडी झाली. या सुंदरवाडी सावंतवाडी मध्ये राजघराण्याशी संबंधित सेवकांच्या वसत्या देखील वसवल्या. प्रत्येक वस्त्यामध्ये राजघराण्याच्या संबंधित अश्या लोकांना स्थान दिले होते. सुंदरवाडीची स्थापना एका राजधानीच्या नगरात करून आध्यमिक उंची सर्व साहित्य आणि कला परंपरने जागतिक स्तरावर स्थान मिळवून देणाऱ्या दुसऱ्या खेम सावंत यांचे स्मारक या नगरीत असणे हे सावंतवाडीला भूषण आहे. याबाबत सर्व सामाजिक, शैक्षणिक संथानमधून चर्चाही झाली. पण स्मारक प्रत्यक्ष्यात झाले नाही. सावंतवाडी संथानचे वैशिष्ट्य जपणे हे कोकण परिसरातील पर्यटनाचा विचार करता अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी नागरिक व इतिहास प्रेमींनी पुढे येणे गरजेचे आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page