कुडाळ /-

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वनरक्षक माणगांव यांनी मौजे माणगांव-भटवाडी चे शासकिय राखीव वन कक्ष क्रमांक 117 व 118 मध्ये जाऊन फिरती करत असताना त्यांचे दिशेने दत्ताराम विठ्ठल हळदणकर व प्रविण आत्माराम सावंत, दोघे रा.भटवाडी, ता. कुडाळ हे समोर येताना दिसून आले. हळदणकर यांचे हातात कुन्हाड व सावंत यांचे खांदयावर लाकूड नग असलेला दिसून आला. वनरक्षक माणगांव यांनी त्यांचे समोर जाऊन त्यांना अटकाव करणेचा प्रयत्न केला असता, दोघेही पळून जात असताना पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेण्यात आले.

त्यानंतर दत्ताराम विठ्ठल हळदणकर व प्रविण आत्माराम सावंत यांना चौकशीकामी ताब्यात घेऊन रेंज कार्यालय कुडाळ येथे डाळ येथे आणले. आरोपींना समक्ष विचारणा करुन त्यांचे जबाब नोंदविले व गुन्हयाची कबुली दिल्याने पंचासमक्ष दि. 09/08/2021 रोजी भारतीय वनअधिनियम 1927 चे कलम 26 (1). (ए. डी. एफ) 41(2-बी). 42(12). 52 महाराष्ट्र वन नियमावली 2014 नियम 31 82(12) अन्वये गुन्हा नोंद करून अटक करणेत आली. रोजी आरोपी क्रमांक 1 व 2 यांना पोलिस कस्टडीतून बाहेर काढून चौकशी

10/08/2021

केली असता, तोड केलेले बुढ दाखविणेस तयार झाल्याने आरोपी क्रमांक 1 व 2 यांना शासकिय जंगलातील गुन्हा घडलेच्या ठिकाणी नेले असता, त्यांनी तोड केलेल्या साग प्रजातीचे झाडाचे बुद्ध यं त्यापासून तयार केलेले साग गोल नग-2, तसेच सदर गुन्हयात वापरलेली हत्यारे लोखंडी कुन्हाड व हात करवत मौजे माणगांव-भटवाडी चे शासकिय राखीव वन कक्ष क्रमांक 117 व 118 येथील घटनास्थळी जावून जप्त करणेत आली. सदर आरोपींना मे न्यायदंडाधिकारी वर्ग-1, कुडाळ यांचे कोर्टात हजर केले असता,मा.न्यायालयाने दोन्ही आरोपींना सशर्त जामीन मंजूर केलेला आहे.वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ श्री. शिंदे म्हणाले शासकिय वनात अपप्रवेश करणे, अवैध वृक्षतोड
करणे तसेच अवैध वाहतुक करणे, भारतीय वनअधिनियम 1927 अन्वये प्रतिबंधित केले असून, त्याचे उल्लंघनाकरिता वर्ष पर्यंतच्या कारावासाची तसेच द्रव्य दंडाची तरतुद करणेत आलेली आहे.

सदर कारवाई ही श्री. शहाजी नारनवर उप वनसंरक्षक सावंतवाडी, श्री. आय. डी. जालगांवकर ,सहाय्यक वनसंरक्षक (खाकुतो व वन्यजीव) सावंतवाडी यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी,कुडाळ श्री. अमृत शिंदे, तसेच वनपाल माणगांव श्री. धु. रा. कोळेकर, वनरक्षक माणगांव श्री. बा.म.जगताप.वनरक्षक श्री.सा. स.कांबळे, श्री.स.के. कांबळे, श्री.सु.म.सावंत, श्री. ज. भा. आरगडे व वनमजूर श्री. आगलावे,कदम व कविटकर, सावंत यांनी यशस्वी केली.(अ. पां. शिंदे) वनक्षेत्रपाल कुडाळ तथा तपासणी अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page