मालवण /-

कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनच्या बिकट परिस्थितीमध्ये रक्तदान व मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबीर होत नसल्याने त्याचा परिणाम रक्तपेढीत रक्तसाठ्याची टंचाई भासत आहे. याचाच विचार करून ‘धक्का’ मित्रमंडळाच्या वतीने ११ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १ यावेळेत दैवज्ञ भवन येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर हे ओरोस ब्लड बँकच्या मागणीची दखल घेऊन आयोजित करण्यात आले आहे. अपघाती व्यक्तीसाठी रक्त, गरोदर महिला, थॅलेसिमिया रुग्ण, कॅन्सर, डायलिसिस रुग्ण, शस्त्रक्रिया या सारख्या गरजू रुग्णांना रक्तदानाची आवश्यकता असते. आताच्या घडीला रक्तसाठा कमी असल्याने सुदृढ नागरिकांनी रक्तदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय नियमांचे पालन करत हे शिबीर घेण्यात येणार आहे. सदृढ नागरिकांनी रक्तदान करण्यासाठी अवश्य पुढे यावे व येताना मित्र परिवारास रक्तदानासाठी घेऊन यावे. ज्या रक्तदात्यांना शिबिर स्थळापर्यंत येण्या-जाण्यासाठी कोणतीच सोय उपलब्ध नसेल, त्यांनी बाबु डायस- ९४२३३०२५१२, भूषण पिसे- ९९६०३८१०३८, अनिकेत चव्हाण- ९१७५१९९७८०, हेमंत शिरगावकर- ९९६०११६४१७, देवदत्त तोडणकर- ९०९६२१३२५९, प्रणव गांवकर- ८४१२९२३७२२, गुणेश हडकर- ७७०९२२४७३७, महेंद्र पारकर- ७७६८८०६६०८, प्रतिक कुबल- ९४०५१८२६४६ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page