कणकवली /-

आजपासून श्रावण महिना सुरू झाला. श्रावण सुरू झाला की अनेक मंदिरं भक्तिमय वातावरणात असतात. कणकवली शहरातील स्वयंभू मंदिर येथेही दरवर्षी श्रावणात भक्तीमय वातावरण असते. पण यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने अत्यंत साध्या पद्धतीने व कोरोनाचे सर्व नियम पाळून श्रावण महिन्यातला पहिला सोमवार साजरा केला जातोय. कोरोनाचे नियम पाळत भक्तांनी स्वयंभूचे दर्शन घेत अभिषेक केला. यावेळी कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी देखील स्वयंभूचे दर्शन घेऊन अभिषेक केला.

दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी श्रावण महिन्यात स्वयंभू मंदिरात मान्यवरांच्या वतीने सकाळी 6 वाजता काकड आरती करण्यात आली. नंतर गणेश पूजन करून भाविकांनी दर्शन घेत दुधाचा अभिषेक केला. दरवर्षीप्रमाणे दुपारी स्वयंभू मंदिरमध्ये नैवेद्य म्हणून महाप्रसाद दाखवण्यात येतो व भाविकही या महाप्रसादाचा लाभ घेतात. पण यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने मोठ्या प्रमाणात महाप्रसाद होणार नसल्याचे स्वयंभू मंदिर मानकरी यांनी सांगितले.

यावेळी मानकरी गावपुरुष सदानंद राणे, खोत अनाजी राणे, विलास राणे, तेजस राणे, विपुल कुलकर्णी, राजू गुरव, संजू करंबेळकर, मनोज राणे, समीर राणे, सूर्याजी राणे व मानकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page