वेंगुर्ला /-


कोरोना प्रतिबंध करण्यासाठी होमिओपॅथिक औषध आर्सेनिक अल्बम् ३० या औषधाचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग झाला असून पहिल्या वर्षी आधी पासूनच शासनाच्या आयुष मंत्रालयाच्या आदेशानुसार सदर औषध मोठ्या प्रमाणात वितरित केल्यास खुप मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी वाचली.
भविष्यात एक ते दोन महिन्यातुन हे होमिओपॅथीक औषध घेतल्यास संभाव्य धोका टाळता येण नक्कीच शक्य आहे,असे प्रतिपादन जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजीव लिंगवत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश भागात मोफत औषध वाटप करताना केले.जनसेवा प्रतिष्ठान,सिंधुदुर्ग, कोकण एज्युकेशन सोसायटीचे लोकनेते अँड.दत्ता पाटील होमिओपॅथीक काँलेज,वेंगुर्ले, माउंटरनीग असोसिएशन आँफ सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले,कणकवली,कुडाळ, सावंतवाडी या शहरामध्ये तसेच माडखोल,धवडकी, बांदा, विलवडे,बांदा,शिरोडा,उभादांडा आदि अनेक गावामध्ये औषध वितरण करण्यात आले.
यासाठी प्राचार्य डॉ.के.जी केळकर, डॉ.संजीव लिंगवत डॉ.आकाश घाडी, डॉ.शिवाजी चव्हाण,डॉ. सई लिंगवत, डॉ.रक्षंदा घाडी, डॉ.सम्रुद्धी देसाई, डॉ. नयनेश गावडे, डॉ.परेश बोवलेकर, डॉ. शामल मांजरेकर,डॉ. दत्तप्रसाद पवार,माउंटरनीक असोसिएशनचे प्रकाश नारकर यांनी रुग्णांना मार्गदर्शन केले.
वितरण यशस्वी पणे करण्यासाठी प्रा.एस्.एन. पाटील,डॉ.कमलेश चव्हाण तेजस राऊळ,अंकुश कोंडीलकर,
परेश नांदोसकर,अनिकेत कुंडगीर,उन्नती खांडेकर, सोनाली कोकरे यांनी विशेष सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page