देवगड /-

देवगड देवगड आगारातून ग्रामीण भागातील प्रवासी फेऱ्या तात्काळ सुरू कराव्या अशी आग्रही मागणी मनसे तालुकाअध्यक्ष चंदन मेस्त्री यांनी स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर यांचेशी चर्चा केली आहे.दरम्यान येत्या सोमवार दि ९ ऑगस्ट पासून देवगड तालुक्यातील ग्रामीण भागातील काही प्रवासी फेऱ्या सुरू करण्यात येत आहेत तसेच वस्तीच्या प्रवासी फेऱ्या चालक वाहक यांची पुरेशी निवासाची व्यवस्था झाल्यानंतर सुरू करण्यात येणार आहे .स्थानिक ग्रा .प.प्रशासनाकडे चालक वाहक वस्ती व्यवस्था करण्यात यावी असा पत्रव्यवहार करण्यात आला असल्याचे एस टी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या चर्चेत मनसे तालुका अध्यक्ष चंदन मेस्त्री,सचिव जगदीश जाधव,उपाध्यक्ष महेश नलावडे,राजा मोंडकर ,विभाग अध्यक्ष परेश आडकर शहर अध्यक्ष सचिन राणे उपस्थित होते.दि २ऑगस्ट रोजी ग्रामीण भागातील तसेच वस्तीच्या प्रवासी फेऱ्या सुरू कराव्यात अशी लेखी मागणी मनसे देवगड तालुक्याच्या वतीने देवगड आगार व्यवस्थापक यांचेकडे करण्यात आली होती .त्या अनुषंगाने मनसे शिष्टमंडळाने स्थानक प्रमुख देवगड याची भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेत शनिवार पासून ,देवगड आचरा हिंदळे, मुणगे मार्गे दु.१.३०,आचरा देवगड पोयरे मार्गे दु ३.०५,देवगड खारेपाटण पाटगाव फणसगाव मार्गे दु ४.४५,(वस्ती )खारेपाटण देवगड स.६.५५ परतीचा प्रवास वरील मार्गे,देवगड कुणकेश्वर मार्गे मिठबाव स.११ वा. मिठबाव कुणकेश्वर देवगड दु .१२.१५ वा मिठबाव कुणकेश्वर देवगड ही प्रवासी फेरी सुरू करण्यात आली आहे. तसेच सोमवार दि ९ ऑगस्ट पासून देवगड सावंतवाडी स.६.३० वा. सुटणार असून परतीच्या प्रवासाला सावंततवाडी येथून ११.१५ वा .निघणार आहे ., देवगड रेंबवली स.८.वा, देवगड मोंड बापर्डे मार्गे,तरळा,दु १२ वा .देवगड हिंदळे मुणगे आचरा मालवण,स.७.४५वा. देवगड कुणकेश्वर मार्गे मिठबाव,दु ३.४५ वा. देवगड शिरगाव स.६.४५ वा. निघणार असून त्या ठिकाणाहून ओंबळ,चौकेवाडी ,तोरसोळे या मार्गावर अंतर्गत प्रवासी फेऱ्या सोडण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page