देवबाग समुद्रकिनारी सकाळी आढळला होता अंबरग्रीस हा देवमाशाच्या उलटी सदृश्य पदार्थ..

कुडाळ /-

आज दिनांक ०६ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास मौजे देवबाग तारकर्ली, ता. मालवण येथून जि.प. सदस्य हरि खोबरेकर यांनी देवबाग समुद्रकिनारी फ्रान्सिस जॉन फर्नाडिस आणि किस्तू लुद्रिक या मच्छिमार बांधवांना ते नेहमीप्रमाणे समुद्र किनारी सकाळी फिरायला गेले असता, व्हेल माश्याचे उल्टी सदृश पदार्श समुद्र काठावर आढळून आल्याचे सांगितले.

त्यानुसार खातरजमा करण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ अमृत शिंदे, परिमंडळ वनअधिकारी श्रीकृष्ण परिट, वनमजूर अनिल परब असे बनविभागाचे पथक फ्रान्सिस जॉन फर्नाडिस यांचे घरी दाखल झाले. फर्नाडिस यांनी दाखविलेल्या पदार्थाची पाहणी करुन, शिंदे म्हणाले की, तो काळसर पिवळ्या रंगाचा असून, त्यास सुगंधी वास असल्याचे सकृत दर्शनी दिसून आले आहे. सदर पदार्थ हा व्हेल माश्याची उल्टी आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी त्याचे नमुने झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, कोलकात्ता येथील लॅबला वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पाठविले जाणार आहेत.

पुढे ते म्हणाले समुद्रात आढळणाऱ्या अनेक प्रकारच्या व्हेल प्रजातींच्या माश्यांमधून स्पर्म व्हेल या प्रजातीच्यसा उल्टीला त्याच्यामध्ये असणान्या स्थिरक (Fixative) गुणधर्मामुळे त्यास महत्व प्राप्त झाले आहे. ही उल्टी “अंबरग्रीस या नावाने ओळखली जाते. त्याचा उपयोग उच्च प्रतीच्या अत्तर निर्मितीमध्ये तसेच सुगंधीत उत्पादनात केला जातो. स्पर्म व्हेल प्रजातीच्या माश्यास वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत संरक्षण प्राप्त आहे. तसेच सी. आय. टी. ई. एस (Convention on International trade in Endangered Species of Wild Fauna and Flora) च्या यादीमध्ये समावेश असून, त्यास IUCN या आंतरराष्ट्रीय संस्थेने संकटग्रस्त म्हणून घोषित केले आहे..

वन्यप्राण्यांची तसेच त्यांच्या कोणत्याही अवयवांची/पदार्थाची विक्री/व्यापारावर प्रतिबंध असून, त्याचे उल्लघनाकरिता ३ ते ७ वर्षाकरिताच्या कारावासाची तसेच द्रव्यदंडाचीही तरतुद आहे. स्थानिक मच्छिमार फ्रान्सिस जॉन फर्नांडिस आणि किस्तू लुद्रिक यांनी जि.प. सदस्य हरि खोबरेकर यांचे माध्यमातून या मौल्यवान पदार्थाबाबत वेळीच वनविभागास कळविलेबाबत वनविभागाकडून त्यांचे प्रामाणिकपणाबद्दल कौतुक करुन आभार मानण्यात आले. वनविभागाकडून आवाहन करण्यात आले की, असा व्हेल माशाचे उल्टी सदृश पदार्थ दिसून आल्यास तात्काळ वनविभागास माहिती देऊन सहकार्य करावे. सदर कार्यवाही मा. उपवनसंरक्षक वनविभाग सावंतवाडी शहाजी नारनवर व मा. सहा. वनसंरक्षक आय. डी. जालगावंकर यांचे मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी कुडाळ अमृत शिंदे, परिमंडळ वन अधिकारी श्रीकृष्ण परिट, वनमजूर अनिल परब राहूल मयेकर व जि. प. सदस्य हरि खोबरेकर यांनी यशस्वी पार पाडली. तसेच जि.प. सदस्य हरि खोबरेकर यांनी वनविभागाने तात्काळ दखल घेतल्याबाबत समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page